AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो मंगळावर लपलाय, लाला मातीवर होणार रक्तरंजित लढाई, संपूर्ण मानव जातीसाठी बाबा वेंगाची ती हादरवणारी भविष्यवाणी

Baba Vanga Prediction : बाबा वेंगा ही एक गूढवादी भविष्यवेत्ती होती. तिचे जगभरात असंख्य अनुयायी आहेत. तिच्या काही गूढ बोलण्याचे अर्थ लावून काही भाष्य करण्यात आले. तिने जी जी भाकीतं केली आहेत, त्यातील काही सत्य झाल्याचा दावा करण्यात येतो.

तो मंगळावर लपलाय, लाला मातीवर होणार रक्तरंजित लढाई, संपूर्ण मानव जातीसाठी बाबा वेंगाची ती हादरवणारी भविष्यवाणी
ती भविष्यवाणी, जिने भरेल कापरेImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 19, 2025 | 5:52 PM
Share

बाबा वेंगा ही बल्गेरियातील गूढवादी भविष्यवेत्ता आहे. तिची भाकीतं अचूक ठरल्याचा दावा तिचे अनुयायी करतात. तिच्या भोवती अनेक गूढ कथांचे जाळे विणल्या गेले आहे. ती जन्मत:च अंध होती. पण ती काही तरी गूढ बोलायची. तिचे अनुयायी दावा करतात की तिला दैवी शक्ती प्राप्त होती. तिला दृष्टी नसली तरी भविष्यातील अनेक गोष्टी तिने दैवी शक्तीमुळे पाहिल्या. त्याविषयी ती पुटपुटत असायची. कधी कधी ठामपणे काहीतरी सांगायची. तिची कथन सत्य होऊ लागल्याचा दावा करण्यात येऊ लागला. आज जगभरात, इंटरनेटच्या दुनियेत तिच्या नावावर असंख्य भाकीतं करण्यात येतात. तीचं एक भाकीत म्हणजे मानवाचं मंगळावर पाऊल ठेवण्याचे स्वप्न दृष्टिपथात आहे. पण त्यापूर्वीच तिने एक इशारा देऊन ठेवला आहे…काय आहे वेंगाचे ते थरारक भविष्य…

मंगळ खुणावतोय

21 व्या शतकात मानवाला चंद्राहून मंगळ आणि गुरू ग्रह खुणावतोय. मंगळ ग्रहावर जीवन असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. नासा आणि इतर देशांच्या अंतराळ संस्था मंगळ ग्रहासाठी खास अभियान राबवत आहे. त्यात भारताची इस्त्रो सुद्धा मागे नाही. मंगळवर काही मोहिमा झाल्या. त्यात मंगळ ग्रहावर पाणी आणि सूक्ष्म जीव असल्याच्या खाणाखूणा मिळाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे वेंगाची भविष्यवाणी हलक्यात घेऊ नका, असे तिचे अनुयायी म्हणतात.

मंगळावर एलियन्स?

बाबा वेंगाच नाही तर अनेक खगोल अभ्यासकांनी मंगळवर मानवा व्यतिरिक्त कुणी तरी आहे, असा दावा यापूर्वी केला आहे. बाबा वेंगाच्या अनुयायांनी तर तिच्या भाकीताआधारे म्हणणे मांडले आहे की, मंगळ ग्रहावर एलियन्सची वसाहत आहे. मंगळावरील लाल मातीत तुम्हाला ते लपलेले दिसतील असा तिचा अंदाज असल्याचा दावा करण्यात येत आहे. अर्थात अजून मानवाचे पाऊल मंगळवार पडले नाही. यापूर्वीच्या मोहिमांमध्ये तसे काही आढळले नाही. पण ते लपलेले असल्याचा दावा बाबा वेंगाने केल्याचे तिचे अनुयायी सांगतात. नासासह अनेक वैज्ञानिक एलियन्सविषयी कोणतीही अधिकृत माहिती देत नसले तरी पृथ्वीसारखेच जीवन दुसर्‍या ग्रहावर असण्याची शक्यता असल्याचेही मान्य करतात.

मंगळ ग्रहावर मानवी वसाहत

रशिया, अमेरिका, चीन आणि भारतही अंतराळ मोहिमांमध्ये उतरला आहे. जगातील सर्व देश मिळून अंतराळासाठी खास मिशन राबवण्याची शक्यता आहे. त्यानुसार 2179 पर्यंत मानवाची मंगळ ग्रहावर वसाहत असेल असा दावा करण्यात येतो. सध्या नासा, स्पेसएक्स, इस्त्रो, चीन आणि रशियाची अंतराळ संस्था मंगळावर मानवी पाऊल टाकण्यासाठी योग्य वातावरण तयार करण्याच्या योजनेवर काम करत आहे.

मंगळ ग्रहावरून पृथ्वीला धोका?

बाबा वेंगा हिच्या दाव्यानुसार मंगळ ग्रहावर एलियन्स लपलेले आहेत. त्यांची तिथे वसाहत आहे. मानवी संशोधनावर ते लक्ष ठेवून आहेत. मानव जेव्हा मंगळ मोहिम हाती घेईल. तिथे पाऊल ठेवले. तेव्हा हा खतरनाक जीव समोर येईल. तिथे रक्तरंजित युद्ध होईल. मंगळाची लाल माती लालेलाल होईल. या युद्धाचे परिणाम पृथ्वीपर्यंत जाणवतील. येत्या दहा वर्षांत मंगळसाठी पृथ्वीवरून मोहिमा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

डिस्क्लेमर : या दाव्यांबद्दल पुरेसे आणि ठोस पुरावे किंवा अधिकृत दस्तावेज उपलब्ध नाही. बाबा वांगा यांच्या भविष्यवाण्या साधारणतः अस्पष्ट आणि विविध अर्थांनी सांगण्यात येतात. हा लेख केवळ माहितीपर आणि चर्चेच्या हेतूने देण्यात आला आहे. या दाव्याची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.