AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबा वेंगाचं खरं ठरलं ते भाकीत; स्मार्टफोन ग्राहकांनी आताच व्हावे सावध, कोणती आहे ती भविष्यवाणी भीतीदायक

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाचे आणखी एक भाकीत खरं ठरल्याचा दावा करण्यात येत आहे. दावा म्हणण्यापेक्षा आपल्या अवती-भवती या गोष्टी घडताना दिसत आहे. तिने स्मार्टफोन ग्राहकांविषयी काही दशकांपूर्वी एक भाकीत केलं होतं. त्याची प्रचिती आता येत आहे. काय होतं ते भाकीत?

बाबा वेंगाचं खरं ठरलं ते भाकीत; स्मार्टफोन ग्राहकांनी आताच व्हावे सावध, कोणती आहे ती भविष्यवाणी भीतीदायक
बाबा वेंगाचं भाकीतImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 15, 2025 | 4:47 PM
Share

बाबा वेंगाची काही भाकीतं खरं ठरल्याचा दावा करण्यात येतो. तिच्या भाकि‍ताची नेहमी चर्चा होत असते. तिने यापूर्वी अमेरिकेत 9/11 दहशतवादी हल्ला होणार, 2025 मध्ये म्यानमार या देशात भूकंप येणार अशी भविष्यवाणी केली होती. जगावर 2025 पासून नैसर्गिक आणि मानव निर्मिती संकटं सुरू होतील. 3797 मध्ये पृथ्वी नष्ट होणार या तिच्या काही भविष्यवाण्यांची बरीच चर्चा आहे. तिची भाकीत ही गूढ काव्यात असल्याने त्यावर अनेक जण मतं व्यक्त करतात. पण स्मार्टफोन विषयी तिने काही दशकांपूर्वी वर्तवलेले भविष्य आता अत्यंत अचूक ठरल्याचा दावा करण्यात येत आहे. तिने काही दशकांपूर्वी अंतर मनाने जे काही पाहिले, ते गूढ शब्धात, कवितेच्या रूपात शब्दबद्ध करण्यात आले.

स्मार्टफोन ग्राहकांसाठी काय होती ती भविष्यवाणी?

Baba Vanga ची एक भविष्यवाणी समोर आली आहे. हे भाकीत स्मार्टफोन ग्राहकांसाठी होते. बाबा वेंगाने सांगितले होते की, मनुष्य एका तळ हाता एवढ्या एका काचसदृश्य यंत्रावर दिवसभर चिटकलेले असेल. 2022 पर्यंत तर अनेक जण चालता, बोलता, खाता-पिता ही स्क्रीन डोळ्यासमोर हलू देणार नाहीत. ते जणू या यंत्राचे गुलाम होतील. तिची ही भविष्यवाणी आता खरी ठरल्याचा दावा करण्यात येतो. आपल्या आजूबाजूला त्याची प्रचिती दिसत आहे. सोशल मीडियावर काही जण सतत पडीक असतात. इन्स्टाग्राम, युट्यूबवरील रील्ससाठी तर अनेक जण मोबाईलाच सर्रास वापर करताना दिसतात. अनेक जण कॉपी पेस्ट आणि अर्थहीन डेटाचा मार या समाज माध्यमांवर करताना दिसतात. बाबा वेंगाच्या मते मानवाला या छोट्या यंत्राचे व्यसन लागले आहे.

स्मार्टफोनचे व्यसन नुकसानदायक

स्मार्टफोनच्या व्यसनामुळे अनेकांचे मोठे नुकसान होईल. समाजातही त्याचे दुष्परिणाम दिसतील, असे भाकीत बाबा वेंगाने वर्तवले होते. त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. स्मार्टफोनच्या व्यसनामुळे केवळ शारिरीकच नाही तर मानसिक आरोग्यावर सुद्धा परिणाम दिसू लागला आहे. स्मार्टफोनच्या अतिरेकी वापरामुळे लोकांमध्ये ताण, चिंता, एकटेपणा, निद्रानाश, नातेसंबंधातील दुरावा आणि इतर अनेक समस्या उद्भवल्या आहेत. तर वाईट कंटेंट सतत समोर येत असल्याने समाजातील तरुण पिढीवर त्याचा वाईट परिणाम होत आहे.

कोण आहे बाबा वेंगा?

बाबा वेंगा हिचे खरं नाव वेंजेलिया पांडेवा गुश्टेरोवा (Vangeliya Pandeva Gushterova) असे आहे. तिचा जन्म बल्गेरियात 3 ऑक्टोबर 1911 रोजी झाला होता. तिला जन्मापासूनच दिसत नव्हते. 11 ऑगस्ट 1996 रोजी 84 व्या वर्षी तिचे निधन झाले. तिच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्याचा दावा करण्यात येतो.

डिस्क्लेमर : बाबा वांगा यांच्या भविष्यवाण्या साधारणतः अस्पष्ट आणि विविध अर्थांनी सांगण्यात येतात. हा लेख केवळ माहितीपर आणि चर्चेच्या हेतूने देण्यात आला आहे. या दाव्याची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.