
मुंबईपासून जवळ असल्यामुळे पनवेल हे पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले आहे. जर तुम्ही पनवेलला जाण्याचा प्लान करत असाल तर खालील 4 ठिकाणे तुमच्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये नक्कीच असावीत.

पनवेलजवळील प्रबळगड किल्ला हे ट्रेकिंगप्रेमींसाठी एक रोमांचक ठिकाण आहे. हा किल्ला डोंगररांगेत वसलेला असून येथून आजूबाजूच्या परिसराचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते. पावसाळ्यात इथला निसर्ग अधिकच खुलून दिसतो.

अदई धबधबा हा पनवेलमधील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय धबधब्यांपैकी एक आहे. विशेषतः पावसाळ्यात येथे निसर्गाची खरी शोभा पाहायला मिळते. हिरवाई, धबधब्याचा आवाज आणि शांत वातावरण यामुळे हे ठिकाण फोटोशूट अतिशय योग्य आहे.

पनवेलजवळच असलेले कर्नाळा पक्षी अभयारण्य हे निसर्गप्रेमी आणि पक्षीनिरीक्षकांसाठी खास ठिकाण आहे. येथे विविध प्रजातींचे पक्षी, वन्यजीव आणि घनदाट जंगल पाहायला मिळते. हिरवळ, डोंगर आणि शांतता यामुळे हे ठिकाण शहराच्या गोंगाटापासून दूर नेणारे ठरते.

कर्नाळा किल्ला हा पनवेलपासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याची शंकूच्या आकाराची रचना त्याला खास ओळख देते. ट्रेकिंगसाठी हा किल्ला फारसा अवघड नसल्यामुळे उत्तम पर्याय ठरतो. इतिहासप्रेमी आणि निसर्गप्रेमींना हे ठिकाण नक्कीच आवडेल.