
भंडारा: बैल आणि त्याचा मालक यांच्यात एक अनोखं नातं असतं! काम करता करता इतका वेळ त्याने त्या बैलासोबत घालवलेला असतो की कालांतराने बैलालाही मालक कळतो, मालकालाही बैल (Ox) कळतो. आपल्याला बाहेरून बघताना असं वाटतं मुक्या जनावरांना काय कळायचं मालकाच्या मनातलं, मालकाच्या सवयी. प्राण्यांमध्येही (Animal) भावना असतातच की, मुक्या जनावरांना सगळं कळत असतं. या सगळ्याची प्रचिती अनेकदा अनेक व्हायरल व्हिडीओज मधून आपल्याला आलीये. असाच एक बैलपोळ्याच्या दिवशी व्हायरल झालेला व्हिडीओ (Bhandara Viral Video) आहे. या व्हिडिओत मालक दारूच्या नशेत आहे. त्या बैलाला मालकाचा असा तर काय राग येतो की बैल आपल्या मालकाला शिंगावर घेतो आणि अक्षरशः फेकून देतो. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय, लोकं पोट धरू धरू हसतायत.
दारुड्या लोकांचा वैताग कुणाला येत नाही? सगळ्यांना येतो. जर तुम्हाला वाटत असेल की फक्त माणसालाच माणसाच्या वाईट सवयीचा त्रास होत असेल तर हा व्हिडीओ बघा. मालकासोबत काम करणाऱ्या या बैलांना दारुड्या मालकाची प्रचंड चीड आहे. महाराष्ट्रात बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बैलांना छान सजवून सगळीकडे मिरवलं जात होतं. आता बैलपोळा म्हणजे बैलांचा आपल्या हक्काचा दिवस! जसा आपला वाढदिवस आपल्या हक्काचा असतो अगदी तसा! बैलांनी पण याचा फायदा घेतला, नेहमीच दारूच्या नशेत असणाऱ्या मालकाला त्यांनी सगळ्यांसमोर शिंगावर घेतलं आणि हे लांब फेकून दिलं…मग काय झाला ना व्हिडीओ व्हायरल! बैलांची वाह वाह च आहे कालपासून सगळीकडे. मालक कुठे आहेत ते काय माहित नाही. बैल आणि मालक फेमस झालेत इतकं नक्की!
दारूचा आणि दारूच्या आहारी गेलेल्यांचा “वीट” मनुष्याप्रमाणे मुक्या जनावरांना देखील येत असल्याची प्रचिती भंडारा पहायला मिळाली असून दारुच्या नशेत असलेल्या मालकाला संतापलेल्या बैलाने चांगलाच इंगा दाखविल्याची घटना घडली आहे. चक्क शिंगावर घेऊन दारुडया मालकाला उचलून फेकल्याने मालकाची मात्र नशा उतरली आहे. पोळया निमित्त हा भन्नाट व्हिडीओ भंडाऱ्यात चांगलाच वायरल झाला असून नेटकऱ्यानी बैलाचे कृतीचे चांगलेच समर्थन केल्याचे दिसतेय..