AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Elephant Viral Video: छोट्याशा हत्तीचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल! प्रश्न पडतो “जंगलाचा राजा नेमका कोण?”

संयमाने माणूस ताकदवर गोष्टींसमोर देखील लढू शकतो. व्हिडिओ पाहा, ज्यात हत्तीने सिंहिणीशी ज्या प्रकारे स्पर्धा केली ती कौतुकास्पद आहे.

Elephant Viral Video: छोट्याशा हत्तीचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल! प्रश्न पडतो जंगलाचा राजा नेमका कोण?
Elephant Viral Video Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 28, 2022 | 11:09 AM
Share

जंगलाचा राजा सिंह (Lion) आहे असं म्हणतात, सिंहीणींचं (Lionesses) वर्चस्वही कमी नाही. खरं तर एकंदरीत वर्चस्व पाहता सिंहीणींनी हत्तीला कधीच चितपट करायला हवं. पण जंगलात काहीही होऊ शकतं. हत्ती एक महाकाय प्राणी आहे आणि त्याने याचाच फायदा का म्हणून घेऊ नये? जंगलाचा एक नियम आहे, इथे कोण कोणावर भारी पडेल, याबाबत काही सांगता येत नाही. तब्बल 14 सिंहिणींनी हत्तीवर हल्ला करतात पण छोटासा हत्ती घाबरत नाही. शांत राहून, संयमाने तो संकटावर मात करतो. व्हायरल होणारा हा व्हिडिओ (Viral Video) खूपच अनोखा आहे, जो पाहून तुम्हाला समजेल की प्रत्येक गोष्टीत ताकदवर बाजूचा विजय होईल असं नाही. संयमाने माणूस ताकदवर गोष्टींसमोर देखील लढू शकतो. व्हिडिओ पाहा, ज्यात हत्तीने सिंहिणीशी ज्या प्रकारे स्पर्धा केली ती कौतुकास्पद आहे.

 14 सिंहीणींनी चारही बाजूंनी घेरले

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तब्ब्ल 14 सिंहीणींनी हत्तीच्या मुलाला चारही बाजूंनी घेरले आहे. त्यांच्याकडे पाहून असे वाटते की, सगळ्यांनी मिळून त्याला बळीचा बकरा बनवलंय. दोन-तीन सिंहिणी हत्तीवर चढून त्याला त्रास द्यायला सुरुवात करतात. आता बघा ना एवढासा तो हत्ती त्याच्यावर त्या सिंहीणी चढतात तर तो घाबरणार असं ज्या क्षणी वाटतं त्याच क्षणी हत्ती न घाबरता गोल गोल फिरू लागतो. अजिबात घाबरत नाही. छोटा गजराज अडचणीच्या वेळी मन लावून काम करतो, ज्यामुळे सिंहीण त्याच्या अंगावरून खाली सुद्धा पडतात. त्यानंतर तो पाण्याच्या दिशेने धावतो पण सिंहिणी त्याला सोडत नाही. हत्ती तिथून पाण्याच्या दुसऱ्या बाजूला जायला लागतो आणि सिंहिणी त्याच्याकडे पाहतच राहते.

व्हिडीओ

व्हिडीओ प्रचंड शेअर

हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी सुसंता नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ लोकांना खूप आवडलाय. व्हिडीओ प्रचंड शेअर केला जातोय. याच कारणामुळे अनेक युजर्स व्हिडिओवर आपला फिडबॅक देत आहेत. हत्तीच्या बळामुळे सिंहीण अपयशी ठरल्याचं एका युझरने म्हटलं आहे. त्याचबरोबर आणखी एका युझरने लिहिले की, जंगलात काहीही होऊ शकतं, काहीही सांगता येत नाही.

Follow Us
तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं भाजपचे नेते करत आहेत
तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं भाजपचे नेते करत आहेत.
LPG चे दर वाढले पण इंधन दराबाबत सरकारचा मोठा निर्णय
LPG चे दर वाढले पण इंधन दराबाबत सरकारचा मोठा निर्णय.
गॅसचा तुटवडा रोखण्यासाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय,...तर कारवाई होणार
गॅसचा तुटवडा रोखण्यासाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय,...तर कारवाई होणार.
आव्हाडांच्या वक्तव्यावरून राजकारण तापले; निलंबनाची मागणी
आव्हाडांच्या वक्तव्यावरून राजकारण तापले; निलंबनाची मागणी.
गॅस तुटवड्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का, तेल-तांदळाच्या दरात वाढ
गॅस तुटवड्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का, तेल-तांदळाच्या दरात वाढ.
विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं चार शब्दात उत्तर, म्हणाले...
विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं चार शब्दात उत्तर, म्हणाले....
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत.
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ.
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप.
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची....
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची.....