AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सासऱ्यानेच लावून दिले सूनेच प्रियकरासोबत लग्न, पतीने केली विदाई…तीन वर्षांपूर्वीच झाला होता प्रेमविवाह

सासऱ्याने सूनेला प्रियकरासोबत रंगेहात पकडल्यानंतर त्याच्याशी लग्न लावून दिले. विशेष म्हणजे या लग्नाची तयारी, खर्च पतीने केला आणि पत्नीला वाटी लावले, तिची विदाई केली. हे लग्न सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

सासऱ्यानेच लावून दिले सूनेच प्रियकरासोबत लग्न, पतीने केली विदाई...तीन वर्षांपूर्वीच झाला होता प्रेमविवाह
पतीने केली विदाईImage Credit source: टीव्ही 9 नेटवर्क
| Updated on: May 15, 2025 | 4:29 PM
Share

एक तरुणीचा तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. दोघांनी एकमेकांना पसंत केल्याने घरच्यांनी आडकाठी आणली नाही. संसार सुरळीत सुरू असतानाच या तरुणीच्या आयुष्यात अजून एकाने एंट्री केली. त्याला भेटण्यासाठी ती चोरून लपून जात होती. पतीला याविषयी कधी शंका आली नाही. पण सासऱ्याला तिचे बदललेले वागणे खटकले. त्याने तिच्यावर पाळत ठेवली आणि सूनेला प्रियकरासोबत रंगेहात पकडल्यानंतर त्याच्याशी लग्न लावून दिले. विशेष म्हणजे या लग्नाची तयारी, खर्च पतीने केला आणि पत्नीला वाटी लावले, तिची विदाई केली. हे लग्न सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

बुलेट कुमारवर जडला जीव

माहितीनुसार, बिहारमधील मुझफ्फपूरमधील बेरूआ (गायघाट) येथील खुशीचे दरभंगा जिल्ह्यातील बनोली या गावातील राजू कुमार सोबत प्रेमसंबंध होते. 2021 मध्ये घरच्यांना ही बाब माहिती झाल्यावर दोघांनी लग्न केले. त्यांच्या लग्नाला दोन्ही कुटुंबांनी संमती दिली. त्यांना 2022 मध्ये एक मुलगा झाला. दोघांचा संसार सुरळीत सुरू होता. पण 2024 मध्ये खुशी पतीसोबत बिहार येथून दिल्लीला गेली. येथे दिल्लीची ओळख बुलेट कुमार सोबत झाली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि दोघे प्रेमात पडले.

काही दिवसांनी ते पुन्हा गावी परतले. पतीला पत्नी धोका देत असल्याचे कधी समजलेच नाही. पण खुशीचे मन गावात लागेना. ती त्याला शेतात जाऊन फोन करत असे. आजकाल सूनेचे कशातच लक्ष लागत नसल्याचे सासऱ्याच्या लक्षात आले. त्याने तिच्यावर पाळत ठेवली. एकदिवशी घरी कोणीच राहणार लक्षात येताच खुशीने प्रियकर बुलेट कुमारला गावात बोलावले. तो घरी आला.

तेव्हा सासऱ्याने दोघांना रंगेहात पकडले. बुलेट कुमार पळून जात असताना त्याला गावकऱ्यांनी पकडले. पोलिसांना बोलवण्यात आले. खुशीने आपणच त्याला बोलावल्याचे सांगितले. बुलेट कुमारसोबतच लग्न करण्याचा हट्ट धरला. त्यामुळे सगळेच हतबल झाले.

सासऱ्याने लावून दिले लग्न

मग सासऱ्याने सुनेचे तिच्या प्रियकराशी लग्न लावण्याचा निर्णय घेतला. पतीने पण तिच्या आनंदा आड न येण्याचे आणि मुल सांभाळणार असल्याचे जाहीर केले. एका गुरूजीला बोलावून, हार आणून दोघांचे लग्न लावण्यात आले. पतीने, खुशीला वाटी लावले. या लग्नाची एकच चर्चा होत आहे. तर सर्व जण राजू कुमार याच्या समजूतदारपणाचे कौतुक करत आहेत.

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.