AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पण बाईच्या नादानं… या ललनेने लावली पाकिस्तान-बांगलादेशमध्ये आग, राजदूताने ढाक्यातून का पळ काढला

Pakistan Ambassador Run Away : बांगलादेशात सध्या पाकिस्तानी राजदूताचे एक प्रकरण चांगलेच गाजत आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या या राजदूताला ढाक्यातून पळ काढावा लागला आहे. एका ललनेमुळे पाक आणि बांगलादेशात सध्या गहजब उडाला आहे.

पण बाईच्या नादानं... या ललनेने लावली पाकिस्तान-बांगलादेशमध्ये आग, राजदूताने ढाक्यातून का पळ काढला
पाक-बांगलादेशात हनी ट्रॅपवरून शिलगलीImage Credit source: गुगल
| Updated on: May 15, 2025 | 3:45 PM
Share

बांगलादेशात सध्या पाकिस्तानी राजदूताचे एक प्रकरण चांगलेच गाजत आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या या राजदूताला ढाक्यातून पळ काढावा लागला आहे. पाकिस्तानचे राजदूत सैयद मारूफ यांना ढाक्यातून गायब व्हावे लागले आहे. 11 मे रोजी ढाक्यातून पळ काढलेले मारूफ हे इस्लामाबाद विमानतळावर टी-शर्ट आणि जीन्सवर दिसले. एका ललनेमुळे पाक आणि बांगलादेशात सध्या गहजब उडाला आहे. तर ढाक्यात एका 23 वर्षीय मुलीने मारूफ यांना चांगलाच इंगा दाखवल्याची खरपूस चर्चा रंगली आहे.

हनी ट्रॅपमध्ये अडकला मारूफ

नॉर्थ-ईस्ट पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, मारूफ हा पाकिस्तानचा राजदूत आहे. बांगलादेशातील एका 23 वर्षीय मुलीच्या जाळ्यात तो अडकला. ही मुलगी एक बँकेत काम करत असल्याचे सांगण्यात येते. तर काहींच्या दाव्यानुसार, ती स्पाय आहे. दोघांमध्ये चांगलेच संबंध फुलले होते. पण अचानक काही तरी साक्षात्कार झाला आणि मारूफ याला आहे त्या कपड्यावर ढाक्यातून पळ काढावा लागला. तो थेट पाकिस्तानच पोहचला. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये या प्रकरणावरून आरोपाच्या फैरी उडाल्या आहेत.

कोण आहे ती 23 वर्षांची मुलगी?

ही 23 वर्षांची तरुणी ढाका शहरात राहते. ती स्थानिक बँकेत काम करते. या मुलीचे आडनाव हक आहे. तिथल्या सोशल मीडियावर या मुलीसोबत मारुफचे अनेक फोटो व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर हक या मुलीने केवळ मारूफ यालाच फॉलो केले आहे. या मुलीने तिच्या सोशल अकाऊंटवर एका बँकेची सहाय्यक संचालक असल्याचा दावा केला आहे. मारूफ ढाक्यातून पळाल्यानंतर या मुलीचे सोशल अकाऊंट बांगलादेशात ट्रेंड होत आहे.

विशेष म्हणजे 2024 मध्ये शेख हसीना यांचे सरकार उलथवण्यात आले. त्यापूर्वी एक वर्षाअगोदर मारूफ याची बांगलादेशात राजदूत म्हणून नियुक्ती झाली होती. 1971 नंतर पहिल्यांदाच बांगलादेशाने पाकिस्तानकडून तांदळाची खरेदी केली होती. त्यामुळे मारूफचे कौतुक झाले होते. मारूफच्या आडून पाक बांगलादेशात नेटवर्क मजबूत करत होता.

सौदीचा राजदूत पण हनी ट्रॅपचा शिकार

मारूफ पळाल्याच्या एक महिन्यापूर्वीच सौदी अरबचा राजदूत सुद्धा हनी ट्रॅपमध्ये अडकला होता. या प्रकरणात बांगलादेशाच्या पोलिसांनी थेट कारवाई केली होती. कारवाई अंतर्गत राजदुताशी संबंधित मॉडेल मेघना हिला पोलिसांनी अटक केली होती. तर सौदीने राजदूताला परत बोलावून घेतले होते. त्यानंतर सौदी आणि बांगलादेशाच्या संबंधावर चिंता व्यक्त होत होती.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.