Video : ऐकावं ते नवलंच! अंत्यविधीवेळी नातेवाईकांचा स्मशानभूमीत डीजेच्या तालावर ठेका, तुफान डान्स व्हीडिओ व्हायरल

| Updated on: May 19, 2022 | 11:47 AM

सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. लोक अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत आले आहेत. प्रत्येकाने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. शक्यतो स्मशानभूमीत शोकाकूल वातावरण असतं पण इथं तसं दिसत नाही. तर सर्वजण शोक व्यक्त करण्याऐवजी नाचत आहेत.

Video : ऐकावं ते नवलंच! अंत्यविधीवेळी नातेवाईकांचा स्मशानभूमीत डीजेच्या तालावर ठेका, तुफान डान्स व्हीडिओ व्हायरल
Follow us on

मुंबई : एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यास त्यावर शोक व्यक्त केला जातो. सगळीकडे शोकाकुल वातावरण असतं. त्या व्यक्तीला अखेरच्या निरोप देताना मृताचे नातेवाईक, मित्रमंडळी, नातेवाईक सर्वांच्याच डोळ्यात अश्रूांचा महापूर येतो. पण आपल्या जवळच्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर डीजे लावून नाचल्याचं तुम्ही कधी पाहिलं आहे का? नसेल तर ही बातमी वाचा…. सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल (viral video) होत आहे. यात एका व्यक्तीच्या निधनानंतर डीजेच्या तालावर नाचताना दिसत आहेत. हा व्हीडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. ही घटना बर्मिंगहॅममधील (Birmingham) आहे. यात अंत्यसंस्कार करताना लोक मोठ्या आवाजात गाणी वाजवून स्मशानात नाचताना दिसत आहेत.

व्हायरल व्हीडिओ

सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. लोक अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत आले आहेत. प्रत्येकाने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. शक्यतो स्मशानभूमीत शोकाकूल वातावरण असतं पण इथं तसं दिसत नाही. तर सर्वजण शोक व्यक्त करण्याऐवजी नाचत आहेत. सोबत डीजे मोठ्या आवाजात गाणी वाजत आहेत. या लोकांचा स्मशानात नाचतानाचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

इंग्लंडमधील बर्मिंगहॅममधील विटन स्मशानभूमीत कॅटी नावाच्या महिलेच्या अंत्यसंस्काराचा हा व्हीडिओ आहे. हा व्हिडिओ birmzisgrime नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 58 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हीडिओवर अनेक लोकांनी त्यांच्या प्रतिक्रियाही दिल्या ​​आहेत. एका अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर असा डान्स मी पहिल्यांदाच पाहतोय. अंत्यविधीवेळी स्मशानभूमीत असा डान्स करणं चूक आहे, असं एक नेटकरी म्हणाला आहे. तर हा असा डान्स करणं ​​अपमानास्पद असल्याचं दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय.