AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : लहान मुलाच्या अजब कलेला कराल सलाम, तोंडातून काढतो यामाहा RX100 चा हुबेहुब आवाज

सोशल मिडीयावर रिल्सच्या माध्यमातून आपली कला दाखवित असतात यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एका मुलाच्या कलेने सर्व चकीत झाले आहेत.

Viral Video : लहान मुलाच्या अजब कलेला कराल सलाम, तोंडातून काढतो यामाहा RX100 चा हुबेहुब आवाज
rx 100 motor cycleImage Credit source: socialmedia
| Updated on: Sep 10, 2023 | 7:29 PM
Share

नवी दिल्ली | 10 सप्टेंबर 2023 : सोशल मिडीयावर अनेक वेळा अनोखे चमत्कारीक व्हिडीओ पाहायला मिळत असतात. ज्याने आपले चांगलेच मनोरंजन होते. असाच अलिकडे एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात एक लहानगा आपल्या जिभेचा वापर करीत असा आवाज काढत आहे की तो ऐकून तो तुम्ही आश्चर्यचकीत झाल्यावाचून रहाणार नाही. हा छोटा मुलगा तरुणांची पसंतीची मोटरसायकल यामाहा आएक्स 100 चा हुबेहुब आवाज काढत आहे. सोशल मिडीयावरील युजर्स त्याच्या या कलेला दाद देत आहेत. युजर्सच्या मते या मुलाचे पाय पाळण्यात दिसत आहेत, लवकरच तो सेलिब्रिटी होणार आहे.

सोशल मिडीयावर रिल्सच्या माध्यमातून आपली कला दाखवित अनेक जण प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचले आहेत. त्यामुळे सोशल मिडीयाचा वापर करीत अनेक जण प्रसिध्द होत आहेत. लहान मुलांचे गाण्याचे, डान्सचे आणि अभिनयाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल होत असतात. मोबाईलच्या शोधामुळे अनेकांच्या कलागुणांना नवीनच प्लॅटफॉर्म निर्माण झाला झाला. अशात एका लहान मुलाच्या व्हिडीओने त्याची कला जगासमोर आला आहे. हा मुलगा अगदी हुबेहुब RX100 मोटरसायकलचा आवाज काढत आहे. या मुलाचे नाव गोपाळ संदीप आसुटकर असे आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील सेलू बु. या गावातील या चिमुकल्याने RX100 बाईक अगदी तंतोतंत काढला आहे.

मुलाचे टॅलेंट पाहा येथे –

या व्हिडीओत आधी हा मुलगा स्वत:चे नाव सांगतो आणि म्हणतो. आता आपण आरएक्स 100 बाईकचा आवाज काढणार आहे. या व्हिडीओला इंस्टाग्रामवरील royal_kastkar___ या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहे. या व्हिडीओ युजरने अनेक कमेंट दिल्या आहेत. एकाने कमेंट केली आहे की हा मुलगा काही दिवसातच सेलिब्रिटी बनेल. अन्य एका युजरने कमेंट केली की तुझ्याकडे लपलेले टॅलेंट आहे. अशा अनेक कमेंट त्याला मिळाल्या आहेत.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?