Girlfriend चा जीव वाचविण्यासाठी “लिव्हर” दिलं! सगळ्यांना विरोध करून जे करायचं तेच केलं…प्रेम कहाणी

अशीच एक प्रेमकहाणी व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती आपल्या गर्लफ्रेंडसाठी आपलं लिव्हर काढतो.

Girlfriend चा जीव वाचविण्यासाठी लिव्हर दिलं! सगळ्यांना विरोध करून जे करायचं तेच केलं...प्रेम कहाणी
मुलीच्या लग्नाआधी आईचे प्रियकरासोबत पलायन
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 13, 2022 | 1:32 PM

“प्रेमात लोकं जीव एकमेकांसाठी जीव देऊ शकतात.” हे वाक्य खूप फिल्मी वाटतं. होतं पण असं! लोक प्रेमात वेडे होतात, एकमेकांवर जीव ओवाळून टाकतात आणि असं एक नाही अनेक उदाहरणं आहेत. आपण तर अशा गोष्टी ऐकलेल्या सुद्धा आहेत. अशीच एक गोष्ट आहे, एका प्रेमाची ज्यात प्रियकराने आपल्या प्रेयसीला लिव्हर दिलंय. ही घटना आहे पाकिस्तानातली! असो, प्रेमाची गोष्ट ही कुठली का असेना शेवटी प्रेम ते प्रेमच!

सध्या पाकिस्तानातील अशीच एक प्रेमकहाणी व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती आपल्या गर्लफ्रेंडसाठी आपलं लिव्हर काढतो.

त्याने आपल्या आजारी प्रेयसीला वचन दिले होते की तो तिच्याशी लग्न करेल. यानंतर त्याने कुटुंब आणि समाजाची पर्वा न करता आपलं वचन पाळलंय.

वास्तविक ही घटना पाकिस्तानातील लाहोरमधील आहे. पाकिस्तानी युट्यूबर सय्यद बासित अली यांनी या जोडप्याशी संवाद साधला. जेव्हा त्यांनी आपली कहाणी शेअर केली, तेव्हा सर्वजण भावूक झाले. युट्यूबर सय्यद बासित अली नेहमीच वेगवेगळ्या लव्ह स्टोरीज घेऊन येत असतात.

या प्रेम कहाणीतल्या मुलाचे नाव शहजाद तर त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव नैना आहे. दोघेही एकत्र शिकले आणि आता एकाच कंपनीत एकत्र काम करतात. दोघेही बराच काळ एकमेकांच्या प्रेमात होते. आता त्यांना लग्नही करायचं होतं.

काही काळापूर्वी नैनाची तब्येत अचानक बिघडली. नैनाच्या लिव्हरमध्ये समस्या आहे आणि लिव्हर बदलावं लागणार असं अहवालात सांगण्यात आलं होतं.

लिव्हर संबंधित या समस्येचं निदान न झाल्यास नैनाचा जीव सुद्धा जाऊ शकतो असंही डॉक्टर म्हणाले. लगेचच शहजादने आपलं लिव्हर द्यायचा निर्णय घेतला.

शहजादचे कुटुंबीय यासाठी तयार नव्हते, मात्र शहजादने सगळ्यांच्या विरोधात जाऊन नैनाला लिव्हर दिलं. नैना बरी झाली आणि यानंतर दोघांनीही लग्न केलं. शहजादचे कुटुंबीय या लग्नाला उपस्थित नव्हते. अशी ही प्रेमकहाणी सद्य बरीच चर्चेत आहे.