AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मार डाला! मुलांनी केलेल्या डान्सने सगळ्यांनाच हसून हसून मारलं

अनेकदा जुनी गाणीही इथे व्हायरल होऊ लागतात. माधुरी दीक्षितचं 'मार डाला' हे गाणं तुम्ही ऐकलं असेलच. सध्या या लोकप्रिय गाण्यावरील एक डान्स व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

मार डाला! मुलांनी केलेल्या डान्सने सगळ्यांनाच हसून हसून मारलं
mar dala songImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 21, 2023 | 6:09 PM
Share

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आहेत. इथे तुम्हाला गाण्यापासून नृत्यापर्यंत आणि भावनिक ते मजेशीर व्हिडिओ पाहायला मिळतील. तुमच्या लक्षात आलं असेल की अनेकदा काही गाणी वेगाने व्हायरल होऊ लागतात आणि त्यानंतर इन्स्टाग्रामवर रिल्सचा पूर येतो. एरवी नवीन गाणी अनेकदा व्हायरल होत असतात, पण अनेकदा जुनी गाणीही इथे व्हायरल होऊ लागतात. माधुरी दीक्षितचं ‘मार डाला’ हे गाणं तुम्ही ऐकलं असेलच. सध्या या लोकप्रिय गाण्यावरील एक डान्स व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यात तीन मुलांनी असा मजेदार परफॉर्मन्स दिला आहे की कोणालाही हसू येईल.

हा व्हिडिओ एका लग्नाच्या मैफिलीचा आहे, ज्यात मुलांनी स्कार्फ घालून अप्रतिम परफॉर्मन्स दिला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की संगीत कार्यक्रमात बरेच लोक जमले आहेत आणि डान्स परफॉर्मन्सची वाट पाहत आहेत. दरम्यान, डान्स फ्लोअरवर तीन मुलांची एन्ट्री झाली आहे. ज्यांनी स्कार्फने तोंड लपवले आहे. मग त्यांचा डान्स सुरू होतो.

बॅकग्राऊंडमध्ये वाजणाऱ्या ‘मार डाला’ या गाण्यावर त्यांनी अगदी मुलींप्रमाणे डान्स केला आहे. त्यांचा लूक अगदी मुलींसारखा असतो. हावभाव, परफॉर्मन्स असा आहे की, संगीतला आलेले पाहुणेही हसले.

मोनास सिंग नावाच्या आयडीसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा मजेशीर डान्स व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 17 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर 1 लाख 88 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक करत विविध मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by @monassingh

काही जण हे पुशअप्स डान्स असल्याचे सांगत आहेत, तर काही आपल्या परफॉर्मन्सने मुलींना मागे टाकत असल्याचे सांगत आहेत. त्याचप्रमाणे एका युजरने ‘माझ्या लग्नात या डान्सची गरज आहे’, असं मजेशीर पद्धतीने लिहिलं आहे, तर दुसऱ्या युजरने ‘या मुलांनी खरंच मारलं’ असं लिहिलं आहे.

देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.
पंकजा मुंडे यांना मोठा झटका, बीड धारुरमध्ये भाजपचे सर्व उमेदवार हरले
पंकजा मुंडे यांना मोठा झटका, बीड धारुरमध्ये भाजपचे सर्व उमेदवार हरले.
30 वर्षांचा वनवास संपला अन् विकास कामांचा... सरोज अहिरेंची प्रतिक्रिया
30 वर्षांचा वनवास संपला अन् विकास कामांचा... सरोज अहिरेंची प्रतिक्रिया.
शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांना मोठा धक्का, जळगावात मविआचा विजय
शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांना मोठा धक्का, जळगावात मविआचा विजय.
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड.
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.