चान्स पे डान्स! नवरी काय थांबेना, नवरदेव बिचारा थकला…

अनेकांना नवरदेवाची दया येत आहे. का? व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हे कळेलच.

चान्स पे डान्स! नवरी काय थांबेना, नवरदेव बिचारा थकला...
Dance video
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 23, 2022 | 5:17 PM

भारतीय विवाहसोहळे खूप खास आणि जबरदस्त असतात. भारतीय लग्न समारंभात पाण्यासारखा पैसा ओतला जातो. या लग्नांमध्ये फक्त खाणं-पिणं नसतं. ट्विटरला एक व्हिडीओ व्हायरल होतोय. मात्र, अनेकांना नवरदेवाची दया येत आहे. का? व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हे कळेलच.

ही व्हायरल क्लिप 2.16 सेकंदाची आहे, ज्यात तुम्ही वधू-वर स्टेजवर डान्स करताना पाहू शकता. मात्र, नवरदेवाला हे नृत्य काही सेकंदांचे असेल, असे वाटते. पण… नवरी थांबत नाही. ती विविध प्रकारच्या स्टेप्स करते.

कधी जमिनीवर बसून, तर कधी खुर्ची मागवून नवरदेवाला त्यावर बसवून मग त्यावर चढून नाचते. या व्हिडीओमध्ये एक-एक करून इतर लोक स्टेजवर येऊन पैसे लुटतात.

नवरदेवाकडे पाहून असं वाटतं की, त्याला आता नाचायचं नाहीये. पण वधू थकत नाही. हे सगळं पाहूनच लोक व्हिडीओ खाली धडाधड कमेंट्स करतायत. काहींना तर नवरदेव गरीब वाटतोय.

वधू-वराचा व्हिडिओ ट्विटर युजरने 19 ऑक्टोबर रोजी @anamika943 शेअर केला होता. कॅप्शनमध्ये लिहिले की, नवरदेव बिचारा अडकलाय.

या व्हिडिओला 1 लाख 81 हजार पेक्षा जास्त व्ह्यूज आणि साडेचार हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावर युझर्सही प्रतिक्रिया देत आहेत.

एका व्यक्तीने लिहिले की, टिक टॉक वाल्या मुलीसोबत लग्न केल्याचा परिणाम. यावर तुमचे काय मत आहे? टिप्पण्यांमध्ये लिहा.