Buffalo Golu: “गोलू”चं मार्केटमध्ये लई वजन! खाद्य कसं, पैलवानासारखं! किंमतीची तर चर्चाच चर्चा
म्हशींच्या खानपान आणि संगोपनासाठी महिन्याला लाखो रुपये खर्च येतो.

तुम्ही दहा कोटींच्या म्हशीबद्दल ऐकलंय का? किसान मेळाव्यात ही म्हैस बराच चर्चेचा विषय ठरलीये. मेरठमध्ये सध्या किसान मेळा सुरू आहे. या किसान मेळ्यात दहा कोटींची म्हैस आकर्षणाचं केंद्र राहिलीये. या म्हशीचे वजन 1500 किलो आहे. तिचं नाव गोलू आहे. गोलूसोबत सेल्फी काढायला लोक प्रचंड गर्दी करत होते. दहा कोटींची म्हैस. ऐकताना विचित्र वाटतं पण हे खरंय. मेरठमध्ये दहा कोटींची ही म्हैस तुम्हाला पाहायला मिळते. मेरठमधील सरदार वल्लभ भाई पटेल कृषी विद्यापीठात किसान मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्यात हरयाणातील पानिपतमधून दहा कोटी रुपयांची म्हैसही मेरठमध्ये पोहोचलीये. गोलू असं या म्हशीचं नाव आहे.
या म्हशीची किंमत दहा कोटींपर्यंत असल्याचं म्हशीचे मालक नरेंद्र सिंह सांगतात. म्हशींच्या खानपान आणि संगोपनासाठी महिन्याला लाखो रुपये खर्च येतो.
या म्हशीपासून मिळणारे उत्पन्नही चांगले आहे. ही म्हैस दररोज 25 लिटर दूध, 15 किलो फळे, 15 किलो धान्य आणि दहा किलो मटार खाते.

Golu Buffalo Viral
याशिवाय हिरवा चाराही तिला दिला जातो. गोलू ला रोज संध्याकाळी सहा किमी चालण्यासाठी नेलं जातं. गोलूच्या शरीराची रोज तेलाने मालिश केली जाते.
या म्हशीचे शुक्राणू विकून म्हशीचे मालक महिन्याला लाखो रुपये कमवतात. हरियाणा व्यतिरिक्त पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये या म्हशीच्या शुक्राणूंची मागणी आहे.
जत्रेत या दहा कोटीच्या म्हशींसोबत सेल्फी काढण्यासाठी लोक गर्दी करतायत. याआधी हरियाणातील कुरुक्षेत्र जिल्ह्यातील कर्मवीर सिंह यांची 9.25 कोटी म्हैस ‘युवराज’ देखील किसान मेळ्याव्यात पोहोचली. साडेनऊ कोटींना खरेदी करण्याची तयारी दर्शवली होती.
मेरठमधील सरदार वल्लभभाई पटेल कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठात 18 ऑक्टोबर रोजी विद्यापीठ परिसरात अखिल भारतीय किसान मेळा आणि कृषी उद्योग ‘कृषी कुंभ 2022’चे उद्घाटन झालंय. याच मेळाव्यात गोलूने हजेरी लावली.
