साप घराजवळही फिरकणार नाहीत, फक्त हा घरगुती उपाय नक्की करा
पावसाळा आणि उन्हाळ्याच्या काळात घरात साप निघण्याची शक्यात जास्त असते. जास्त करून ग्रामीण भागांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसून येते. अशा परिस्थितीत, डोंगराळ भागात राहणारे लोक शतकानुशतके काही खास घरगुती उपायांचा अवलंब करत आहेत, त्यापैकी एक सर्वात प्रभावी उपाय आपण पाहणार आहोत.

अनेकदा गावी आपण पाहिले असेल की कोणाच्या ना कोणाच्या घरी साप हा निघतच असतो. मग त्यावेळी सापाला पाहूनच अंगातलं आवसान गळून जातं. सापाला पकडायला एक तर सर्पमित्राला बोलावलं जातं,किंवा त्याला शोधून मारलं जातं. पण एक असा उपायत आहे जो केल्याने साप घरात शिरायचं तर सोडाच पण घराजवळही फिरकणारही नाही. उन्हाळा आणि पावसाळ्यात घरांभोवती साप जास्त दिसतात. अशा परिस्थितीत, डोंगराळ भागात राहणारे लोक शतकानुशतके काही खास घरगुती उपायांचा अवलंब करत आहेत, त्यापैकी एक सर्वात प्रभावी उपाय आज आपण पाहणार आहोत.
तर नक्कीच साप त्या भागात येणार नाही
तो उपायत म्हणजे जुन्या टायरचे रबर जाळणे. जर तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात किंवा आजूबाजूच्या परिसरात दररोज जुन्या टायरचा एक छोटासा रबराचा तुकडा जरी जाळला तर. साप त्या भागात येणार नाहीत.
सापांना हा वास आवडत नाही
खरंतर, टायर जळल्यावर तीव्र वास येतो. तो वास सापांना अजिबात आवडत नाही. या कारणास्तव, ते त्या क्षेत्रापासून दूर राहतात. हा उपाय करण्यासाठी, प्रथम जुन्या टायरमधून रबराचे छोटे तुकडे करा. मग दररोज संध्याकाळी त्याचा एक तुकडा अंगणात, कुंपणात किंवा घराबाहेरील कोणत्याही मोकळ्या जागेत जाळा. हे ठिकाण घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा साप येण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करा. जरी हा उपाय बराच प्रभावी असल्याचं म्हटले जात असले तरी, टायर जाळताना काही खबरदारी घेणे महत्वाचे आहे.
हा उपाय करताना काय खबरदारी घ्यावी?
टायरचा तुरडा जळल्याने धूर निर्माण होतो. ते थेट श्वासात जाऊ नये म्हणून, ते फक्त मोकळ्या आणि हवेशीर जागेत जाळा. लहान मुलांना त्यापासून दूर ठेवा आणि तुम्हीही टायर जळत असताना त्यापासून थोडे लांबच उभे राहा. अनेक ग्रामीण कुटुंबे वर्षानुवर्षे हा उपाय अवलंबत आहेत. विशेषतः ज्या घरात पाळीव प्राणी असतात किंवा जिथे लाकूड, गवत इत्यादी गोळा केले जातात अशा घरात. तिथे साप येण्याचा धोका जास्त असतो. जरी हे पूर्णपणे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नसले तरी, अनेक लोकांच्या अनुभवांवरून हा उपाय प्रभावी असल्याचे म्हटलं जातं. जर तुम्हीही अशा परिसरात राहत असाल तर. जिथे सापांपासून धोका आहे. तर तुम्ही एकदा हा घरगुती उपाय करून पाहू शकता.