Live रिपोर्टिंग सुरू असताना अचानक महिला पत्रकाराला मागून दिली धडक, पाहा पुढे काय झालं…

असे बरेच व्हिडिओ आहेत, जे पाहून प्रत्येकाला आश्चर्य वाटेल. असे व्हिडिओज् येताच इंटरनेटवर व्हायरल (Viral) होत असतात. आता याप्रकारामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वेस्ट व्हर्जिनिया टेलिव्हिजनच्या वृत्तनिवेदकाला थेट प्रसारणादरम्यान कारनं धडक दिली.

Live रिपोर्टिंग सुरू असताना अचानक महिला पत्रकाराला मागून दिली धडक, पाहा पुढे काय झालं...
रिपोर्टरला मागून दिली धडक
| Updated on: Jan 22, 2022 | 10:27 AM

आपल्या आजूबाजूला अनेकदा असं काहीतरी घडतं जे सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल होतं. कधी वार्ताहरांचे कारनामे तर कधी लाइव्ह (Live) डिबेटमध्ये असं काहीतरी विचित्र घडतं ज्यामुळे सगळेच हसतात. इंटरनेटवर असे बरेच व्हिडिओ आहेत, जे पाहून प्रत्येकाला आश्चर्य वाटेल. असे व्हिडिओज् येताच इंटरनेटवर व्हायरल (Viral) होत असतात. आता याप्रकारामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वेस्ट व्हर्जिनिया टेलिव्हिजनच्या वृत्तनिवेदकाला थेट प्रसारणादरम्यान कारनं धडक दिली. मात्र, ती रिपोर्टर उठली आणि पुन्हा तिचं रिपोर्टिंग सुरूच ठेवलं.

मागून दिली धडक

एका एसयूव्ही वाहनानं महिला पत्रकाराला मागून धडक दिली आणि धक्का दिल्यानं ती महिला पत्रकार जमिनीवर कोसळल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. उठल्याबरोबर ती म्हणाली, अरे देवा! मला कारनं धडक दिली, पण मी ठीक आहे. मला नुकतीच एका कारनं धडक दिली, पण मी ठीक आहे, टिम. अँकर टिम इर म्हणाला, की टोरी, तुझी टीव्हीवर ही पहिलीच वेळ आहे. रिपोर्टर टोरी योर्गी म्हणाली, मी ठीक आहे, आम्ही सर्व चांगले आहोत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यासोबतच लोक त्यांच्या प्रतिक्रियाही शेअर करत आहेत.

रिपोर्टर अँकरला ओळखतही नाही

व्हिडिओमध्ये अँकरनं विचारलं, की तुला किरकोळ दुखापत झालीय की तू उंच उभी होतीस? मी खरंच सांगू शकत नाही. मी आत्ताच तुला स्क्रीनवरून गायब होताना पाहिले. रिपोर्टरनं उत्तर दिलं, की मी टिमलाही ओळखत नाही. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून तो व्हायरल झाला आहे.

ट्विटर अकाउंटवर शेअर

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही Timothy Burke नावाच्या पेजवर सर्व व्हिडिओ पाहू शकता. हा व्हिडिओ आश्चर्यकारक आहे. यासोबतच काही सोशल मीडिया यूझर्स आहेत, जे हा व्हिडिओ पाहून हसतदेखील आहेत.

घाट पार करण्यासाठी ट्रॅक्टरचालकाचा जीवघेणा प्रवास, बीड जिल्ह्यातला Video होतोय Viral

Video : जंगल सफारीवेळी गाडीत घुसला सिंह, पुढे काय घडलं तुम्हीच पाहा!

Video : भाजी विकणारा माकड पाहून नेटकरी म्हणाले भावासोबत सौदेबाजीचा त्रास कोण घेईल…