AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुलूप तोडून घरात घुसला, पलंगावर झोपला, जाताना असं काही… अनोळखी व्यक्तीच्या कारनाम्याने तिला धक्का

एक महिला तिच्या मैत्रिणीच्या घरी असताना दुसरा इसम थेट तिच्या घरात घुसला. तिच्या बेडवर झोपला. थोड्या दिवसांनी त्याने तिला थेट सोशल मीडियावर मेसेज पाठवायला सुरूवात केली.

कुलूप तोडून घरात घुसला, पलंगावर झोपला, जाताना असं काही... अनोळखी व्यक्तीच्या कारनाम्याने तिला धक्का
| Updated on: Sep 13, 2023 | 7:02 PM
Share

एडिनबर्ग | 13 सप्टेंबर 2023 :  तुम्ही घरात नसताना एखादी व्यक्ती तुमच्या घरात घुसली आणि राहून गेली, हे समजले तर कसे वाटेल, धक्का बसेल ना ? साहजिकच आहे. पण अशी घटना प्रत्यक्षात घडली आहे. एक महिला बाहेर गेली असताना, एक इसम थेट तिच्या (man broke in womans house) घरात घुसला. तिच्या पलांगवरही झोपला आणि एक वस्तूही सोडून गेला. त्या महिलेने घरी आल्यावर हे पाहिलं आणि सिक्युरिटी कॅमेरा चेक केला असता, जे दिसलं ते पाहून तिला धक्काच बसला. हे प्रकरण स्कॉटलंड येथील आहे. तो इसम घरात फार घाण पसरवून गेला होता. जमिनीवर आणि बेडवर तर रक्ताचे डागही दिसत होते. पण हे इथंच थांबल नाही. त्यानंतर त्या इसमाने महिलेला सोशल मीडियावर शोधून तिथे मेसेजही पाठवले. हे पाहून ती हादरलीच.

न्यूयॉर्क पोस्टटनुसार, 22 वर्षीय सुलिवान कॅटलिन ही तिच्या मित्राच्या घरी एक रात्र थांबली होती. ती सकाळी उठली असता फोनवर तिला सिक्युरिटी कॅमेरा सॉफ्टवेअरवरून सूचना येऊ लागल्या. आणि तिच्या घरात कोणीतरी घुसल्याचे उघड झाले. माझा विश्वासच बसत नव्हता. मी हैराण झाले होते. पण हे नक्की काय होतंय हेच मला कळेना. एक पुरूष माझ्याच बेडवर झोपला होता, याची मी कल्पनाच करू शकत नव्हते. तो माझ्या घरात नेमका घुसला कसा, हेच मला समजत नव्हते, असे सुलिवानने सांगितले. मात्र घरात कोणी घुसल्याचे लक्षात येताच तिने पोलिसांना कळवले आणि ती घराच्या दिशेने निघाली.

घुसखोराला अजूनही अटक नाही

मात्र, या घुसखोराला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या घटनेनंतर काही दिवसांनी त्याच इसमाने सुलिवान हिच्याशी फेसबूरवर संपर्क साधला आणि तिला मेसेज पाठवू लागला. ‘मी तुमची मनापासून माफी मागतो. माझी तब्येत बरी नव्हती. मला तुमच्या घरी विश्रांती घेऊ दिल्याबद्दल धन्यवाद. कोणतेही नुकसान झाले नसेल अशी आशा आहे. आपण एक दिवस भेटू शकू, अशीही मी आशा करतो, असे त्याने मेसेजमध्ये नमूद केले. मात्र या मेसेजमुळे सुलिवानची चिंता वाढली असून तिच्या मुलाबद्दलही तिला काळजी वाटत आहे. तिने तातडीने परत पोलिसांशी संपर्क साधला असतात त्यांनी त्या इसमाला सोशल मीडियावर ब्लॉक करण्याचा सल्ला दिला. पण एकदा घरात घुसलेला तो इसम पुन्हा आपल्या घरी येऊ शकतो, अशी भीती सुलिवान हिला वाटत आहे. या इसमाला अद्याप अटक न झाल्यामुळे तिला सुरक्षिततेची काळजी वाटत आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?