कोंबडीमुळे झाला भयंकर अपघात,एका झटक्यात स्कुटरसह कोलमडला चालक Viral Video

अपघाताचा एक हैराण करणारा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत एका तरुणाचा अपघात एका कोबंडीमुळे झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हा स्कुटर चालक त्यामुळे स्लीप होऊन डोक्यावर पडल्याचे पाहून पाहणाऱ्यांना देखील आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही.

कोंबडीमुळे झाला भयंकर अपघात,एका झटक्यात स्कुटरसह कोलमडला चालक Viral Video
| Updated on: Jul 14, 2025 | 7:52 PM

रस्त्यावरुन वाहन चालवताना किती काळजी घ्यावी लागते याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. कारण वाहन चालवताना आपली चूकी असो किंवा नसो तरी तुम्हालाच म्हणजे वाहन चालकाचा त्याची शिक्षा भोगावी लागते. या व्हिडीओत स्कूटर चालकाचा असा कोंबडीमुळे अपघात झाल्याचे उघडकीस आले आहे. या अपघाताची कल्पनाही करु शकत नाही असा प्रकारे झाला आहे. हा अपघाताचा व्हिडीओ आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका स्कुटीचालकाचा आहे. या व्हिडिओत स्कुटर चालकाचा कोंबडीमुळे मोठा अपघात झाला आहे. हा नजारा एका सीसीटीव्हीत कैद झाला आहे. आता सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर ही गोष्ट समजेल की हा अपघात यामुळे झाला की या तरुणाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे ही स्कुटर स्लीप होऊन हा तरुण खाली कोसळला. या व्हिडीओला पाहून प्रत्येक जण आश्चर्यचकीत झाला आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की एका स्कुटरचालकाच्या स्कुटर समोर अचानक एक कोंबडी येते आणि तो गोंधळतो. आणि अचानक तो स्कूटरचा ब्रेक दाबतो त्यामुळे त्याचे स्कुटरवरील नियंत्रण जाऊन ती कोसळले तसा तोही रस्त्यावर कोसळतो. कारण ब्रेक दाबल्याने बॅलन्स जातो. त्यामुळे दुसऱ्या क्षणी हा तरुण जमीनीवर जोरात कोसळतो. हा अपघात एका कोंबडीमुळे झाल्याने सर्वांना आश्चर्य वाटते. हा व्हिडीओ पाहून लक्षात आले असेल की रस्त्यावर स्कूटर चालवताना किती सावध रहावे लागते.

येथे पाहा व्हिडीओ –

या व्हिडीओला इंस्टावर dientuhaitienनावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहे.या व्हिडीओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहीले आहे. या व्हिडीओला पाहून लोक मजेदार कमेंट करत आहे. एका युजरने म्हटले आहे की म्हणून वाहन चालवताना आपले लक्ष लोकांकडे राहीले पाहीजे. दुसऱ्या एका युजरने म्हटले की या लेव्हलचा खतरनाक अपघात मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहीला. अन्य एकाने या व्हिडीओवर कमेंट करताना म्हटले की कोंबडीमुळेही अपघात होऊ शकतो हे पहिल्यांदाच पाहीले..!