कोंबडीचे नाव ठेवले ‘नर्मदा’, मग झाला की हो ‘राडा’; व्हेटरनरी कॉलेजच्या त्या जाहिरातीवरून वाद पेटला
Chicken name Narmada : एका कोंबडीवरून मोठे महाभारत घडले आहे. कोंबडीच्या जातीचे नाव 'नर्मदा' ठेवल्याने एकच वाद पेटला आहे. त्यावरून हिंदू संघटना तापल्या आहेत. काय आहे त्यांचा दावा? काय आहे या वादाचे कारण?

Controversy over veterinary college advertisement : एका कोंबडीवरून मोठे महाभारत घडले आहे. एका पशूवैद्यकीय महाविद्यालयाने कोंबडीच्या जातीचे नाव ‘नर्मदा’ ठेवल्याने एकच वाद पेटला आहे. नर्मदा नदी ही आई मानण्यात येते. कोंबडीचे नाव तसे ठेवल्याने त्यावरून संताप व्यक्त होत आहे. त्यावरून हिंदू संघटना तापल्या आहेत. काय आहे त्यांचा दावा?
मध्यप्रदेशातील हरदा जिल्ह्यातील हे प्रकरण आहे. या ठिकाणच्या एका खासगी पशूवैद्यकीय महाविद्यालयाने एक जाहिरात दिली. त्यात कोंबडीच्या जातीचे नाव नर्मदा निधी असे ठेवले. त्यावरून वाद पेटला आहे. नर्मदीय ब्राह्मण समाजाने त्यावर हरकत घेतली आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांनी एक निवदेन पण समाजाच्या वतीने दिले.
ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष अशोक पाराशर यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी संजीव कुमार नागू यांची भेट घेतली. त्यांनी समाजाच्या वतीने कोंबडीला नर्मदा हे नाव देण्यावर हरकत नोंदवली. याविषयीचे निवेदन दिले. नर्मदा ही केवळ एक नदी नाही. तर या भागातील सर्वच लोकांसाठी वंदनीय आणि श्रद्धेय आहे. ती नदी नसून एक आई आहे. नर्मदीय ब्राह्मण समाजाची लोक स्वतःला नर्मदेचे मानस पूत्र मानतात. त्यांनी या जाहिरातीत कोंबडीच्या जातीला जे नवीन नाव नर्मदा दिले आहे, ते तात्काळ हटवण्याची आग्रही मागणी केली.
सदर खासगी महाविद्यालयाचे संचालक राजीव खरे यांनी कोंबडी विक्रीसाठी जाहिरात दिली होती. त्यात कोंबडीच्या या नवीन जातीचे नाव नर्मदा निधी आणि सोनाली असे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हिंदू संघटना आणि पुरोहित संघटनांनी नाराजी जाहीर केली आहे. त्यांच्यामते यामुळे नर्मदेचे पूजा करणारे, नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांच्या श्रद्धेला धक्का बसला आहे. खरे यांनी सांगितले की, त्यांनी जबलपूर येथील एका कोंबडी विक्री केंद्रावरून या कोंबड्यांची खरेदी केली होती. या कोंबड्यांना कडकनाथ, नर्मदा निधी आणि सोनाली अशी नावे पूर्वीपासूनच आहेत. ती नाव महाविद्यालयाने ठेवलेली नाहीत, असा दावा खरे यांनी केला. आता हे नाव खरंच हटणार का याची चर्चा रंगली आहे. अनेकांनी या नावावर त्यांची हरकत नोंदवली आहे. यापूर्वी त्यावर आक्षेप का नोंदवला नाही, असा सवाल कॉलेजने विचारला आहे.
