AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : जनतेला वाटतंय, सगळे आमदार माजलेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले, कालच्या राड्यावरून असे कान पिळले

Vidhanbhavan Lobby Rada : विधानभवनातील लॉबीत काल गोपीनाथ पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते भिडले. या प्रकाराने राज्यात खळबळ उडाली. त्यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कान पिळले. त्यांनी याप्रकारावर राज्यात काय चर्चा सुरू आहे, याची जाणीव सभागृहातील सन्मानिय सदस्यांना करून दिली.

Devendra Fadnavis : जनतेला वाटतंय, सगळे आमदार माजलेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले, कालच्या राड्यावरून असे कान पिळले
देवेंद्र फडणवीसImage Credit source: सौजन्य विधानसभा
| Updated on: Jul 18, 2025 | 4:07 PM
Share

विधानभवनाच्या लॉबीत आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते भिडले. कायदेमंडळाची इभ्रत कुठे आणि कोणत्या खुटीला टांगली हे वेगळं सांगायची गरज नाही. कालच्या राड्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्याची चर्चा झाली. या प्रकाराच्या तीव्र प्रतिक्रिया समाज माध्यमातून उमटल्या. त्यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन्मानिय सदस्यांना राज्यातील जनतेच्या मनात या घटनेच्या काय प्रतिक्रिया उमटल्या याची जाणीव करून दिली.

जनतेला वाटतंय आमदार माजलेत

कालच्या घटनेने कोणा एका व्यक्तीची प्रतिष्ठा खराब झालेली नाही. इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा खराब झाली आहे. आज बाहेर ज्या काही शिव्या पडत आहेत. त्या एकट्या पडळकर किंवा यांच्या माणसाला पडत नाही. आपल्या सगळ्यांच्या नावे याठिकाणी बोलले जाते, हे सगळे आमदार माजले आहेत, असे म्हटले जात असल्याच्या कानपिचक्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिल्या. प्रत्येक गोष्टीचं राजकारण करून आपण राज्यातील जनतेला काय सांगणार आहोत, अशाप्रकारे समर्थन करणे योग्य होणार नसल्याचे ते म्हणाले.

मग मुख्यमंत्र्यांनी थेट सुनावले

ही विधानसभा आमदारांच्या किंवा मंत्र्यांच्या मालकीची नाही. महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेच्या मालकीची ही विधानसभा आहे. समाजाला दिशा देणारे काम झाले पाहिजे. पण विचारातून चर्चेतून संदेश जाण्याऐवजी लाथा बुक्क्यांचा संदेश जात असेल तर सर्वांनी चिंतन करण्याची गरज आहे आपण दोघांना सांगितले व त्यांनी खेद व्यक्त केला. शब्दातून निघणारे विष हे नागाच्या विषापेक्षा अधिक विषारी असते, असे मुख्यमंत्र्यांनी सुनावले.

आपण माणसं आहोत, राग अनावर होतो. पण आपला चर्चेचा स्थायीभाव हा डिस्कशन असावा कुणी मीडियासमोर अश्लील बोलत आहे. कुणी अध्यक्षांसमोर अध्यक्ष मॅनेज असल्याचे बोलत आहे. नियमाने याठिकाणी ४५ लक्षवेधी होण्याची गरज आहे. २०० लक्षवेधी घेत आहोत. अशावेळी जी भाषा आपण वापरतो, ती योग्य नाही. तिसरी भाषा कुठल्या वर्गात शिकायची, हे समिती ठरवेल. पण आपण त्रिसूत्री ठरवावी लागेल. संसदीय परंपरा, भाषेचे पालन व सातत्याने संवाद ठेवावा लागेल, याचे भान त्यांनी सदस्यांना करुन दिले.

काल जी मारामारी झाली, कुणी कोणासोबत कोण येतंय. याबाबत शिस्त असली पाहिजे सर्जेराव टकले यावर सहा गुन्हे आहेत. नितीन देशमुख वर ८ गुन्हे आहेत. अशी मंडळी येऊन मारामारी करतात, हे योग्य नाही. अध्यक्षांनी घेतलेला निर्णय योग्य. काहींनी चूक केली म्हणून सर्वांना शिक्षा नको. योग्य सुरक्षा व्यवस्था उभारा. कुठलाही अभ्यागत येऊ द्या. बिल्ल्याशिवाय तो दिसता कामा नये. एखाद्याने येऊन आतंकवादी घटना केली तर जबाबदारी कोण. आमदार बिल्ला लावून येतात. पण अभ्यागतांच्या गळ्यात किमान एक ओळखपत्र असावे. नाहीतर सुरक्षा रक्षकांनी त्यास बाहेर काढावे. ज्या लोकांनी संधी मिळाली नाही म्हणून एजंट म्हटले, हस्तक म्हटले त्यांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो, असे ते म्हणाले.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.