
आजकाल असा एकही व्यक्ती नाही जो सोशल मीडियाचा वापर करत नाही. सोशल मीडियावर अनेक व्हिडिऔ व्हायरल होत असतात. त्यातल्या त्यात एखाद्या प्राण्याचा व्हिडिओ असेल तर तो जास्तीत जास्त व्हारल होतो. आपण सोशल मीडियावर अनेकदा धुम्रपान आपल्या शरीरासाठी हानिकारक आहेत असे व्हिडिओ पाहिलेत परंतु, जर एखादा प्राणी जर धुम्रपान करत असेल तर ही आश्चर्याची बाब नाही का? होय सोशल मीडियावर काही दिवसांपासून एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे तर अनेकांना हसू देखील येत आहे. आपण बघतो अनेकजण आपला तणाव दूर करण्यासाठी सिगरेट पितात.
परंतु सिगरेटचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक मानले जाते. सिगरेटमध्ये भरपूर प्रमाणात हानिकारक घटक असतात ज्यामुळे आरोग्यार गंभीर परिणाम होऊ शकतो. सिगरेटमध्ये भरपूर प्रमाणात निकोटीन असतो ज्यामुळे तुम्हाला काही काळ तानापासून मक्ती मिळते परंतु, काही क्षणानंतर तुमच्या शरीरामध्ये हार्मोन्स असंतुलित होते. सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये एक चीनमधील ग्वांग्शी येथील नानिंग प्राणीसंग्रहालयात एका गोरिल्लाला माणसासारखा सिगारेट ओढताना दिसले.
सादर घटना एका पाहुण्याने रेकॉर्ड केली होती, जी आता इंटरनेटवर व्हायरल झाली आहे. तथापि, लोकांनी व्हिडिओ पाहिल्याबरोबर, प्राण्याच्या कृती पाहून ते थक्क झाले. त्याच वेळी, अनेक वापरकर्ते या मुक्या प्राण्यांना आपल्या माणसांच्या चुकांचे फळ भोगावे लागेल याबद्दल संतापले आहेत. नॅनिंग प्राणीसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की त्यांना व्हायरल व्हिडिओची माहिती आहे आणि ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत. एखाद्या पाहुण्याने जाणूनबुजून गोरिल्लाच्या आत जळत्या सिगारेटचे बट फेकले होते का हे कर्मचारी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अहवालात असेही म्हटले आहे की प्राणीसंग्रहालयाने जनतेला आश्वासन दिले आहे की ते व्यवस्थापन प्रयत्नांना बळकटी देईल आणि प्राणीसंग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांमध्ये प्राण्यांच्या सुरक्षिततेबद्दल जागरूकता निर्माण करेल. याशिवाय, प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांना काहीही खाऊ घालू नका किंवा त्यांच्या दिशेने कोणतीही वस्तू फेकू नका, असे आवाहनही पर्यटकांना करण्यात आले आहे.
येथे पाहा पोस्ट –
इंस्टाग्रामवर @travly पेजवरून व्हिडिओ शेअर करताना वापरकर्त्याने कॅप्शन दिले की, हा गोरिला चीनच्या प्राणीसंग्रहालयात सिगारेट ओढताना पकडला गेला. व्हिडिओमध्ये गोरिला माणसांसारखा सिगारेट ओढताना दाखवण्यात आला आहे. धूर सोडण्यापूर्वी तो प्राणी बराच वेळ ओढतो आणि नंतर सिगारेट संपल्यावर ती विझवतो. व्हायरल व्हिडिओवर अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहेत. एका वापरकर्त्याने कमेंट केली, भाऊ, गोरिल्ला हे कधी शिकला? दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटले की, या बिचाऱ्या मुक्या प्राण्यांना आपल्या चुकांचे परिणाम भोगावे लागतील. दुसऱ्या एका युजरने लिहिले, प्राणीसंग्रहालय प्रशासन झोपले होते का?