महाराष्ट्र, गुजरात की बिहार? कोणत्या राज्यातील लोक सर्वाधिक काम करतात, जाणून घ्या
Most Hardworking States in India: जेव्हा कामाचा विचार केला जातो तेव्हा गुजरातचे लोक एका आठवड्यात सर्वात जास्त काम करतात. त्याचबरोबर बिहारची जनता सर्वात कमी काम करते. इतकेच नव्हे तर स्मार्ट कामात गोव्याची लोकसंख्या आघाडीवर आहे. तुम्ही हे सर्वेक्षण एकदा वाचाच.

Most Hardworking States in India: बऱ्याच काळापासून भारतीयांच्या कामाच्या सवयींवर चर्चा होत आहे. आपण जास्त काम करतो की कमी? काही लोकांचा असा विश्वास आहे की जास्त वेळ काम केल्याने उत्पादकता वाढते, तर काहींचे म्हणणे आहे की कठोर परिश्रमापेक्षा स्मार्टपणे काम करणे महत्वाचे आहे. याविषयीची आकडेवारीही समजून घ्यावी लागेल.
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषद रिपोर्ट आणि 2019 च्या टाइम युज सर्व्हेच्या आकडेवारीवर आधारित TOI च्या अहवालात काही धक्कादायक खुलासे झाले आहेत. यावरून गुजरातची जनता दीर्घकाळ काम करण्यात आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. त्याच वेळी, गोव्याचे लोक सर्वात कमी काम करतात परंतु तरीही त्यांचे आर्थिक उत्पादन अधिक आहे.
कोणत्या राज्यात सर्वाधिक काम होते?
एका अभ्यासानुसार, गुजरातमधील 7.2 टक्के कर्मचारी आठवड्यातून 70 तासांपेक्षा जास्त काम करतात. हा आकडा देशात सर्वाधिक आहे. पंजाब, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालही त्याच्या जवळ आहेत. दुसरीकडे, बिहारमध्ये जास्त वेळ काम करणाऱ्यांची संख्या सर्वात कमी आहे. बिहारमध्ये केवळ 1.1 टक्के कर्मचारी आठवड्याला 70 तास काम करतात. पंजाबमध्ये 7.1 टक्के, महाराष्ट्रात 6.6 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 6.2 टक्के आणि केरळमध्ये 6.2 टक्के कर्मचारी आठवड्याभरात 70 टक्के काम करतात. पण रोजच्या सरासरी कामाच्या तासांचा विचार केला तर दिल्लीकर आघाडीवर आहेत. दिल्लीत लोक 8.3 तास काम करतात, तर गोव्यात हेच प्रमाण फक्त 5.5 तास आहे. ईशान्य भारतातील बहुतेक राज्यांमध्ये ही दिवसातून सहा तासांपेक्षा कमी काम होते.




गावकऱ्यांपेक्षा शहरी रहिवासी जास्त काम करतात का?
खेड्यापाड्यात राहणाऱ्या भारतीयांपेक्षा शहरात राहणारे भारतीय जास्त वेळ काम करतात, असेही या अभ्यासातून समोर आले आहे. शहरांमध्ये कामाचा सरासरी दिवस 7.8 तास आहे, तर खेड्यांमध्ये हा आकडा साडेसहा तास आहे. राजस्थान (8.6 तास), उत्तराखंड (8.3 तास) आणि गुजरात (8.3 तास) या शहरी कुटुंबांमध्ये सर्वाधिक काम आहे. मेघालय (6.3 तास), मणिपूर (6.1 तास) आणि गोवा (5.9 तास) या राज्यांमध्ये सर्वात कमी काम केले जाते. ग्रामीण भारतात उत्तराखंड (7.7 तास), पंजाब (7.3 तास) आणि झारखंड (7.2 तास) हे सर्वाधिक सरासरी होते, तर आसाम, नागालँड आणि गोव्यात कामाचे तास कमी होते.
स्त्री-पुरुष, कोण जास्त काम करतं?
पुरुष आणि महिलांमध्ये कामाच्या तासांमध्ये मोठा फरक असल्याचेही या अभ्यासातून समोर आले आहे. पुरुष पगारी कामांवर जास्त वेळ घालवतात, तर विशेषत: खेड्यापाड्यातील स्त्रिया पैशांशिवाय घरातील कामांचा भार अधिक उचलतात. शहरी भागात पुरुष 8.2 तास, तर महिला 6.2 तास काम करतात. ग्रामीण भागात पुरुष 7.3 तास आणि महिला 5.6 तास काम करतात.