AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इथे 500 रुपये सुट्टे मिळण्याची मारामार… अन् या देशांमध्ये मात्र 1 लाखाची नोट चलनात; कोणते देश आहेत हे?

जगातील अनेक देशांमध्ये 1 लाखाची नोट दैनंदिन व्यवहारात वापरली जाते, जेथील चलन अत्यंत कमजोर असल्याचे दर्शवते. भारत किंवा डॉलरच्या तुलनेत हे चलन खूपच स्वस्त असते. आर्मेनिया, इराण, इंडोनेशिया आणि व्हिएतनामसारख्या देशांमध्ये 100,000 मूल्याच्या नोटा सामान्यपणे चलनात आहेत. हे उच्च मूल्याचे चलन अनेकदा महागाई आणि आर्थिक दुर्बलतेचे संकेत देते.

इथे 500 रुपये सुट्टे मिळण्याची मारामार... अन् या देशांमध्ये मात्र 1 लाखाची नोट चलनात; कोणते देश आहेत हे?
noteImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 21, 2025 | 7:19 PM
Share

एखाद्या देशाचं चलन किती कमजोर आहे, हे तिथल्या बँकेच्या नोटांवरून कळतं. ज्यांच्या नोटांचं मूल्य लाखांमध्ये असतं तिथलं चलन अत्यंत कमजोर असल्याचं स्पष्ट होतं. म्हणजेच तिथले लोक अधिक मूल्य असलेल्या नोटा सामान्य खर्चासाठीही वापरतात. जगातील अनेक देशांबरोबरच आशियातील अनेक देशातही अधिक मूल्य असलेल्या नोटा चलनात आहेत. या देशांचे चलन डॉलर किंवा भारताच्या रुपयाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यामुळेच स्थानिक लोक त्याला मोठी रक्कम मानत नाहीत. नेहमीच्या वापरातील नोटांसारखाच या नोटांचा वापर करतात. ज्या देशांमध्ये एक लाखाची नोट रोज वापरली जाते, म्हणजेच ज्या देशांमध्ये एक लाखाची नोट चलनात आहे, अशा देशांची माहिती जाणून घेऊया.

आर्मेनियामध्ये एक लाखाची नोट

आर्मेनिया हा एक छोटासा देश आहे. पण या देशात जगातील सर्वात मोठी बँक नोट चलनात आहे. आर्मेनियात एक लाख ड्रमची (ड्रम म्हणजे चलन) नोट चलनात आहे. आर्मेनियाचे ड्रम अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत अत्यंत कमकुवत आहे. त्यामुळेच ड्रमची किंमत लाखोंमध्ये आहे. आर्मेनियाच्या एक लाखाच्या ड्रमच्या नोटवर तिथल्या सरकारचा फोटो छापलेला आहे.

इराणमध्येही लाखाची नोट

इराणमध्येही एक लाख रियालची नोट चलनात आहे. इराणची ही नोट 2010मध्ये चलनात आली. यापूर्वी इराणमध्ये 50 हजाराची रियालची नोट चलनात होती. इराणमधील ही सर्वात मोठी नोट होती. आता एक लाख रियालची नोट या देशात व्यवहारात आली आहे. इराणच्या मुद्रेत एवढी मोठी संख्या असल्याने त्याचा दैनंदिन कामकाजावरही परिणाम होतोच. याशिवाय या देशात महागाई एवढी वाढलीय की रिलायची किमतही त्याच्या पुढे कमी झालीय.

इंडोनेशियातही एक लाखाची नोट

इंडोनेशियात सर्वात मोठी नोट एक लाखाची आहे. इंडोनेशियाची मुद्राही अत्यंत कमजोर मानल्या जाते. भारतीय रुपयाच्या तुलनेत इंडोनेशियाची मुद्रा अत्यंत कमजोर आहे. त्यामुळेच तिथली सर्वात मोठी नोटही रोजच्या व्यवहाराचा एक भाग झाली आहे. इंडोनेशियातील या एक लाखाच्या नोटेवर इंडोनेशियाच्या पहिल्या राष्ट्रपतींचा फोटो छापलेला आहे.

व्हिएतनाममध्येही लाख मोलाचं चलन

व्हिएतनाममध्ये एक लाख डोंगची नोट आहे. 2004मध्ये ही नोट चलनात आली असून आजही चलनात आहे. ही हिरव्या रंगाची नोट पॉलिमरने बनलेली आहे. त्यामुळे व्हिएतनामची एक लाख डोंगची नोट लवकर खराब होत नाही. या नोटोवर व्हिएतनामच्या नेत्याचा फोटो आहे. नोटेच्या मागच्या बाजूला टेम्पल ऑफ लिटरेचर म्हणजे ज्ञानाचं मंदिर छापलेलं आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.