AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काला हूं तो क्या हुआ… लग्नानंतर जोडप्याची चर्चा; ट्रोलर्सना नवऱ्याने दिले खतरनाक उत्तर

आजही खूप जण रंगभेद करतात, पण काही लोक रंग नव्हे, हृदयातून प्रेम करतात. असंच एक जोडपं सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय. लग्नाचे फोटो-व्हिडीओ पाहून शुभेच्छा देण्याऐवजी लोकांनी मात्र त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. कारण फक्त एकच, नवरा काळा आहे! पण या ट्रोलर्सना नवऱ्याने असा दणका दिलाय की सगळेच थक्क झाले.

काला हूं तो क्या हुआ... लग्नानंतर जोडप्याची चर्चा; ट्रोलर्सना नवऱ्याने दिले खतरनाक उत्तर
Viral CoupleImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 30, 2025 | 2:04 PM
Share

माणसाचे प्रेम हे त्याच्या दिसण्यावरुन किंवा रंगरुपावरुन ठरत नाही. ते एकमेकांशी जोडलेल्या भावना, जीवापाड एकमेकांना जपणे, एकमेकांचा चुका पोटात घालून एकत्र असण्याला प्रेम म्हटले जाते. प्रेमात कधीही रंगभेद येत नाही. सध्या सोशल मीडियावर एका जोडप्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील जोडप्याला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. पण, नवरदेवाने मात्र, सगळ्यांची बोलती बंद केली आहे.

प्रेमाला रंग नसतो, रूप नसतो… फक्त प्रेम असतं!

सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे जोडपं मध्ये प्रदेशमधील आहे. जवळपास 11 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. हे जोडपं आहे ऋषभ राजपूत आणि शोनाली चौकसे. तब्बल 11 वर्षांच्या साथीनंतर दोघांनी लग्न केलं. लग्नाचे फोटो-व्हिओ व्हायरल झाले आणि ट्रोलर्सनी लगेच हल्ला चढवला. का तर नवरी अतिशय सुंदर आणि गोरी आहे. तर नवरा मुलगा हा रंगाने काळा आहे. एका यूजरने कमेंट करत, “अरे, ही इतकी गोरी, याने काय जादू केली असेल?” असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, “पैसे असतील किंवा सरकारी नोकरी असावी, म्हणून लग्न केलं असेल” असे म्हटले आहे. काहींनी तर थेट ऋषभच रंगावरुन मजा घेतली आहे.

View this post on Instagram

A post shared by Jist (@jist.news)

पण ऋषभने दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष

ऋषभने सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट लिहिली आहे. “तुम्हाला निराश करायला आवडेल, पण मी सरकारी नोकरी करत नाही. मी आमच्या फॅमिली बिझनेसमध्ये काम करतो. आज माझी कमाई चांगली आहे, पण जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं तेव्हा तिने माझ्यावर प्रेम केलं. कॉलेजच्या दिवसापासून ती माझ्यासोबत आहे. चांगल्या-वाईट प्रत्येक क्षणात. म्हणून लोक काय म्हणतात याचा मला कणभरही फरक पडत नाही” असे तो म्हणाला.

पुढे तो म्हणाला, मी जन्मापासून रंगभेदाला तोंड देत आलोय. माझा रंग सावळा आहे हे मला माहीत आहे. पण एकच सांगतो, माझ्या कुटुंबाबद्दल चुकीचं बोलू नका. तुमच्या नजरेत मी फक्त एक साधासुधा सावळा माणूस असू शकतो, पण माझ्या बायकोच्या नजरेत मी जगातील सर्वोत्तम नवरा बनण्याचा प्रयत्न करतो… आणि तेच मला महत्त्वाचं आहे. 2014 मध्ये मी पहिल्यांदा हा क्षण ‘मॅनिफेस्ट’ केला होता. हा 30 सेकंदांचा व्हिडओ माझ्या 11 वर्षांच्या भावनांचा साठा आहे. मी घाबरलो नव्हतो, फक्त त्या सगळ्या भावना एकदम बाहेर येत होत्या.”

सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ.
नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे
नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे.
क्रू मेंबर पिंकी माळी यांचा मृत्यू; स्थानिकांची सरकारकडे 'ही' मागणी
क्रू मेंबर पिंकी माळी यांचा मृत्यू; स्थानिकांची सरकारकडे 'ही' मागणी.
अंत्यसंस्कारानंतर कार्यकर्त्यांचा टाहो; पार्थ, जय पवारांनी जोडले हात
अंत्यसंस्कारानंतर कार्यकर्त्यांचा टाहो; पार्थ, जय पवारांनी जोडले हात.