भर लग्नात नवरदेव खेळला क्रिकेट! Video Viral

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मंडपात बसलेल्या नवरदेवाचा एक शॉट आहे.

भर लग्नात नवरदेव खेळला क्रिकेट! Video Viral
Cricket lover groom
Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 15, 2022 | 4:05 PM

भारतात क्रिकेटला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इथे क्रिकेटची क्रेझ इतकी आहे की, लोक रात्री उशिरापर्यंत जागून प्रत्येक सामना पाहतात. संघ हरला तर त्यांची निराशा होते. ऑफिस आणि घरात क्रिकेट मॅचेसवर वाद होतात. पण जर क्रिकेटची आवड लग्नापर्यंत पोहोचली तर? एक व्हिडीओ असाच व्हायरल झालाय. ज्यात नवरदेवाचा क्रिकेटवरचं प्रेम दिसून येतंय. या व्हिडीओमध्ये तुम्ही नवरदेवाचं क्रिकेट कौशल्यही पाहू शकता. या व्हायरल व्हिडिओवर युजर्सही जोरदार कमेंट्स करतायत.

लग्नात काढलेला हा व्हिडीओ पाहिलात तर तुम्हालाही हसू आवरणार नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मंडपात बसलेल्या नवरदेवाचा एक शॉट आहे.

या व्हिडिओमध्ये पंडितजी मंडपात मंत्र पठण करताना आणि लग्नाचे विधी पूर्ण करताना दिसत आहेत. या काळात तिथे उपस्थित असलेले लोकही दिसतात. लग्नविधींवर सगळ्यांचं लक्ष असतं, पण नवरदेवाचं लक्ष दुसरीकडेच असतं.

व्हिडिओत स्पष्टपणे दिसतंय की, नवरदेवाचा एक मित्र त्याच्या दिशेने फुलं फेकतो, जो नवरदेव कशाने तरी उडवतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युझर्स म्हणत आहेत की, नवरदेव मोठा क्रिकेटप्रेमी आहे.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत 31 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. युझर्सनी यावर मजेशीर कमेंट्स केल्यात.