AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Love Affair | 35 वर्षांचा पाकिस्तानी मुलगा 70 वर्षाच्या आजीच्या प्रेमात पडला, मग दोघांनी…..

Love Affair | अशा लग्नामागे फक्त पैसाच उद्देश असतो, की अजून काही?. ही Love Story कशी सुरु झाली?. याआधी सुद्धा अशी अनेक प्रकरण समोर आली आहेत.

Love Affair | 35 वर्षांचा पाकिस्तानी मुलगा 70 वर्षाच्या आजीच्या प्रेमात पडला, मग दोघांनी.....
Diffrent Love StoryImage Credit source: social media
| Updated on: Sep 22, 2023 | 10:18 AM
Share

लाहोर : सीमा पार प्रेमकथांची प्रकरण सध्या वेगाने वाढत आहेत.  सीमा हैदर आपल्या प्रियकरासाठी पाकिस्तानातून भारतात आली. त्याचवेळी अंजू भारतातून पाकिस्तानात गेली. आता आणखी एक प्रेम प्रकरण समोर आलय. या प्रेमकथेच वैशिष्ट्य म्हणजे दोघांच्या वयामधील अंतर. असं म्हणतात की, प्रेमात वय, रंग, रुप पाहिलं जात नाही, एका 35 वर्षीय पाकिस्तानी मुलाने 70 वर्षाच्या कॅनेडीयन महिलेला आपलं जीवन साथी बनवलं. दोघांनी लग्न केलय. डेली पाकिस्तानच्या रिपोर्ट्नुसार या व्यक्तीच नाव नईम आहे. दोघांच्या वयामधील अंतर पाहून दोघांना मोठ्या प्रमाणात टोमणे मारले जात आहेत. या लग्नामागे प्रेम नाही, तर दुसरच कारण आहे, अशी चर्चा सुरु आहे. नईमला गोल्ड डिगर बोलून त्याची खिल्ली उडवली जात आहे.

चौफेर सुरु असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर नईमने एक मुलाखत दिली. त्याने सांगितलं की, मी आणि माझ्या पत्नीमध्ये जवळपास दशकभरापूर्वी फेसबुकवर मैत्री झाली होती. 2017 मध्ये आमच्यात लग्नाबद्दल चर्चा झाली होती. नईम आणि कॅनेडीयन महिलेमध्ये आधी फक्त मैत्री होती. ही मैत्री पुढे कधी प्रेमात बदलली, हे त्यांना सुद्धा समजलं नाही. या कपलच्या वयामध्ये मोठ अंतर आहे, त्यावरुन लोक बऱ्याच चिंता व्यक्त करत आहेत. वयोवृद्ध महिला लग्नासाठी स्वत: कॅनडाहून पाकिस्तानात आली. पत्नीसोबत कॅनडाला स्थायिक होण्याची योजना असल्याच नईमने सांगितलं. फक्त पैसा की अजून काही उद्देश?

नईमच्या बायकोला आरोग्याच्या समस्या आहेत. तिची देखभाल सुद्धा महत्त्वाची आहे. या जोडप्याने पैसे कमावण्यासाठी आपलं युट्यूब चॅनस सुरु करण्याची योजना बनवली आहे. लोक मला गोल्ड डिगर बोलतायत, असं सुद्धा नईम म्हणाला. माझी बायको श्रीमंत कुटुंबातील नाहीय. ती फक्त पेन्शनवर अवलंबून आहे असं नईमने सांगितलं. याआधी सुद्धा अशी अनेक प्रकरण समोर आली आहेत. ज्यात पाकिस्तानी पुरुषांनी त्यांच्यापेक्षा वयाने दुप्प्ट असलेल्या महिलांबरोबर लग्न केलय. संबंधित देशाच नागरिकत्व मिळवणं हा अशा लग्नांमागे उद्देश असतो.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.