
मुंबई : जगात माणुसकी खूप कमी लोकांमध्ये पाहायला मिळते. माणुसकीचं दर्शन घडवणारी अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील. काही बातम्या आपल्याला अतिशय भावूक करुन जातात. अशीच एक भावूक करणारी बातमी अमेरिकेतून पुढे आली आहे. पेनसिल्व्हेनियामधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरस ( Viral Video ) होत आहे. या व्हिडिओमध्ये एका हॉटेलमध्ये काही मित्र ख्रिसमसनिमित्त पार्टी करण्यासाठी आले होते. या दरम्यान एक अशी घटना घडली जी पाहून तुम्हाला ही नक्कीच नव्वल वाटेल. ( Customer Gave Her 1,300 Dollars Tip to Pregnant Waitress )
जेमी मायकल नावाचा व्यक्ती त्याच्या दोन मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता. यावेळी त्यांना जेवण वाढणारी वेट्रेस ही गर्भवती असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पण यानंतर त्यांनी मित्रांनी जे केले ते चांगलेच व्हायरल झाले आहे. या मित्रांनी अॅशले बॅरेट नावाच्या वेट्रेसला 1300 डॉलर्स म्हणजेच सुमारे 1.10 लाख रुपयांची टीप दिली. वेट्रेसने बिल आणताच, जेमी मायकेलने 1300 डॉलर काढले आणि महिलेला दिले.
जेमी मायकेलने इतकी मोठी टीप देताच तिने सुरुवातीला नकार दिला. नंतर ती महिला भावूक झाली आणि रडत रडत जेमी मायकलला मिठी मारली. तुला आतापर्यंत मिळालेली सर्वात मोठी टीप किती आहे? यावर ऍशले म्हणते की 100 डॉलर्स. जेमी म्हणतो की मी आणि माझ्या मित्रांनी मिळून टीपसाठी काही पैसे गोळा केले आहेत.
अॅशले दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. जेमी मायकेलने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर तो व्हायरल होतोय. जेमीने लोकांना या वेट्रेसला मदत करण्याचे आवाहनही केले. लोकही वेट्रेसला मदत करत आहेत.
लोक जेमीच्या या कामाचे कौतुक करत आहेत आणि अशा लोकांमुळे जगात माणुसकी शिल्लक असल्याचं म्हणत आहेत.