जणू काही स्वर्गच पृथ्वीवर उतरलाय! तुम्ही म्हणाल “ही जागा पृथ्वीवर नाहीच!”

एखाद्या स्वप्नात पाहिले की काय असं वाटतं. पण मित्रांनो हा व्हिडीओ पृथ्वीवरचाच आहे. होय!

जणू काही स्वर्गच पृथ्वीवर उतरलाय! तुम्ही म्हणाल ही जागा पृथ्वीवर नाहीच!
Deer Viral Video
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 02, 2022 | 10:35 AM

हा हरणांचा कळप बघा. व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. व्हिडीओ पाहताना असं वाटतं आपण स्वर्गात आहोत. हरणांचा कळप एका स्वच्छ पाण्यात छान फिरताना दिसतोय. हे पाणी तर आपल्याला अक्षरशः कुठेच दिसणार नाही इतकं स्वच्छ आणि निळंशार आहे. हरीण एखाद्या स्वप्नात पाहिलेत की काय असं वाटतं. पण मित्रांनो हा व्हिडीओ पृथ्वीवरचाच आहे. होय! विश्वास बसणार नाही असं हे सुंदर दृश्य स्वित्झर्लंड मधलं आहे.

बुइटेंजबिडेन यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या या क्लिपमध्ये हरणांचा कळप दिसत आहे. तलावाच्या स्वच्छ पाण्यासोबत अनेक हरीण या तलावात चालताना दिसतात.

“स्वित्झर्लंडमधील ब्रींझ सरोवराच्या स्वच्छ पाण्याचा आनंद घेत असलेले हरीण,” असं कॅप्शन व्हिडीओ शेअर करताना देण्यात आलंय. हे स्वित्झर्लंडमधील ब्रींझ सरोवर आहे जे एखाद्या स्वर्गासारखं दिसतंय!

आपल्याला हा व्हिडीओ बघताना अनेक प्रश्न पडतात, स्वर्ग असाच असेल का? पाणी जर माणसाच्या संपर्कात आलंच नसतं तर इतकंच स्वच्छ असतं का? पाण्याचा खरा रंग हाच का?

या व्हिडीओ वर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्यात. कुणी म्हणतं, “हे किती शांतता असणारं आहे”. कुणी म्हणतं, “नयनरम्य दृश्य”