पाकिस्तानचा ‘तो’ व्हिडीओ दिल्ली पोलिसांनी केला शेअर! लोकांना सांगितला नियम

यावेळीही त्यांनी क्रिएटिव्हिटीचा वापर करत पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील आशिया कप फायनल मॅचची क्लिप शेअर केलीये.

पाकिस्तानचा तो व्हिडीओ दिल्ली पोलिसांनी केला शेअर! लोकांना सांगितला नियम
Srilanka Pakistan Match Viral Video
Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 12, 2022 | 5:26 PM

आशिया कपच्या (Asia Cup Final Match)अंतिम सामन्यादरम्यान पाकिस्तानचा कॅच सोडल्याचा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. आता दिल्ली पोलिसांनी दोन पाकिस्तानी खेळाडूंनी सोडलेल्या याच कॅचचा व्हिडिओ शेअर करत लोकांना रस्ता सुरक्षेसाठी एक अनोखा संदेश दिला आहे. रस्ते अपघात टाळण्यासाठी दिल्ली पोलीस अनेकदा असे मजेशीर व्हिडिओ शेअर करून जनजागृती करत असतात. यावेळीही त्यांनी क्रिएटिव्हिटीचा वापर करत पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील आशिया कप फायनल मॅचची क्लिप शेअर केलीये. ही क्लिप आधीच भरपूर व्हायरल (Viral Video Pakistan) होत होती. आता दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) शेअर केल्या पासून लोकं हसून हसून लोटपोट होत आहेत.

मॅचच्या शेवटच्या चेंडूवर श्रीलंकेच्या फलंदाजाने सीमारेषेवर जोरदार फटका मारला आणि चेंडू पकडण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचे दोन क्षेत्ररक्षक एकमेकांना भिडले, परिणामी फलंदाजाला 6 धावा मिळाल्या.

हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. दिल्ली पोलिसांनी हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ए भाई, जरा देख के चलो”

व्हिडिओ

दिल्ली पोलिसांच्या ट्विटचा व्हिडिओ प्ले केला की, बॅकग्राऊंडमध्ये ‘ए भाई, जरा देख के चलो’ गाणं वाजायला सुरुवात होते. हे गाणे १९७० मध्ये प्रदर्शित झालेल्या राज कपूर स्टारर ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटातलं आहे.

श्रीलंकेने काल पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव करत आशिया कप जिंकला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने एकूण 170/6 धावा केल्या, तर पाकिस्तानचा संघ 20 षटकांत केवळ 147 धावा करू शकला.

श्रीलंकेच्या डावातील अखेरच्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर बाद होण्याची संधी होती, पण पाकिस्तानचा शादाब खान आणि आसिफ अली एकमेकांना धडकले.

यावेळी भानुका राजपक्षे ने मोहम्मद हसनैनच्या चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला.