Viral : ती मेलीच असती, डिलिव्हरी बॉयने वाचवला जीव, त्यानंतर जे घडलं त्याची कल्पनाही… तुमचा अंदाज काय?

एक चिनी महिला फ्रीझरमध्ये अडकली होती आणि मृत्युच्या वाटेवर होती. पण एका डिलिव्हरी बॉयने तिचा आवाज ऐकून तिला वाचवलं. कृतज्ञतेने, महिलेने त्याला आपल्या कंपनीच्या अर्ध्या शेअर्सची भेट दिली. ही घटना चीनमधील वृत्तपत्रांमध्येही प्रकाशित झाली आहे. या घटनेवरून चांगल्या कर्माचे फळ कसे मिळते हे सिद्ध होते.

Viral : ती मेलीच असती, डिलिव्हरी बॉयने वाचवला जीव, त्यानंतर जे घडलं त्याची कल्पनाही... तुमचा अंदाज काय?
Image Credit source: Getty Images
| Updated on: Sep 13, 2025 | 2:20 PM

चांगले कर्म केले तर त्याचं फळही चांगलंच मिळतं. त्यामुळे फक्त चांगली कर्म करत राहावीत, त्याचा कुठे ना कुठे फायदा होतोच. चीनच्या डिलिव्हरी बॉयच्या बाबतही असंच काही घडलंय. एक चिनी महिला फ्रिजरमध्ये अडकली. फ्रिजर बंद होता. त्यामुळे ही महिला शंभर टक्के मरणार होती. पण तिथून जाणाऱ्या एका डिलिव्हरी बॉयला तिचा आवाज ऐकू आला. त्याने थोडा कानोसा घेतला आणि या महिलेला वाचवलं. गोष्ट इथपर्यंत ठिक आहे. पण महिलेचा जीव वाचल्यानंतर जे घडलं ते फार इंटरेस्टिंग आहे. असं काही घडेल याची तुम्ही कल्पनाही करणार नाही. तेच घडलं.

चीनच्या बहुतेक वर्तमानपत्रांनी या बातमीला कव्हर केलंय. मध्य चीनच्या हुनान प्रांतात राहणाऱ्या चेन नावाच्या महिलेच्या जीवावर बेतणारी एक घटना 31 ऑगस्टच्या संध्याकाळी घडली. ही महिला आपल्याच कंपनीच्या फ्रिजरमध्ये बंद झाली होती. त्यामुळे ती मरणार होती. तिचा श्वास गुदमरायला लागला होता. जगण्यासाठी तिची धडपड सुरू होती. जोरजोरात आवाजही देत होती. पण तिचा आवाज कुणापर्यंतच पोहोचत नव्हता. काय करावं या गोष्टीने तिला टेन्शन आलं. आता आपण जगणार नाही या कल्पनेनेच तिला हादरवून टाकलं होतं. फ्रिजरमधल्या थंडीतही तिला घाम फुटला होता.

सुरक्षेच्या नियमाकडे दुर्लक्ष

ही महिला तिच्या कोल्ड चेन लॉजिस्टिक्स कंपनीच्या फ्रिजरमध्ये एकटीच प्रोडक्ट्सचं वर्गीकरण करत होती. फ्रिजरच्या मेन गेटमध्ये एक छोटा दरवाजा बनवलेला आहे. सुरक्षा नियमानुसार सामान घेऊन जाण्यासाठी दोन व्यक्तींची गरज असते. पण त्या दिवशी माझ्याकडून निष्काळजीपणा झाला. सामान घेऊन जाण्यासाठी मी पूर्ण दरवाजा उघडला, असं चेन म्हणाली.

एक चूक भोवली…

त्यानंतर सामान फ्रिजरच्या आत घेऊन गेल्यावर मी करकचून दरवाजा बंद केला. बाहेरून येणाऱ्या उष्ण वाफांमळे कार्डबोर्ड बॉक्स ओले होऊ नये म्हणून तिने दरवाजा लावून घेतला. त्यानंतर ती कामात मग्न झाली. पण काम संपल्यावर जेव्हा बाहेर पडायचं होतं तेव्हा दरवाजा उघडत नसल्याचं तिच्या लक्षात आलं. बॅकअप स्विच तुटला होता. त्यामुळे फ्रिजरमध्ये आत आडकली. तिने गरमीच्या हिशोबाने कपडे गातले होते. तिच्याकडे फोनही नव्हता. त्यामुळे ती कुणालाही फोन करू शकत नव्हती.

मायनस 20 डिग्री तापमान

हा फ्रिजर मेन रोडपासून दूर होता. ज्यावेळी ही महिला आत फसली तेव्हा तिथून फारच कमी लोक जात होते. सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे फ्रिजरचं तापमान शून्य ते 20 डिग्री सेल्सिअसच्या खाली सेट केलं होतं. त्यामुळे जोपर्यंत मी गायब झाल्याचं लोकांना कळणार नाही, तोपर्यंत आपल्याला याच थंडीत राहावं लागणार आहे. त्यामुळे आपण जिवंत राहू शकणार नाही, याची तिला कल्पना आली. तरीही तिने सुटकेसाठी जोराचा प्रयत्न सुरू केला. पकोड्याचा एक डब्बा तिने दरवाजावर आदळला. हा आवाज ऐकून तरी लोक मदतीला येतील अशी तिची कल्पना होती. पण कुणीच तो आवाज ऐकला नाही.

अन् चमत्कार घडला

कुणीही वाचवायला येत नाही हे पाहिल्यानंतरही या महिलेने कच खाल्ली नाही. फ्रिजर जवळून जेव्हा कोणी जातानाचा आवाज यायचा तेव्हा ती चपलेने फ्रिजरचा दरवाजा वाजवायची. तिचं नशिब चांगलं की बऱ्याच वेळा नंतर तिथून एक डिलिव्हरी बॉय लियू जू चालला होता. त्याने चेनचा आवाज ऐकला. त्यानंतर तो लगेच चेनच्या मदतीसाठी धावला. तब्बल 20 मिनिटे फ्रिजरमध्ये अडकलेल्या चेनला लियूने बाहेर काढलं. एव्हाना चेन थंडीने थरथरत होती. तिचं संपूर्ण अंग थंड पडलं होतं. दातओठ कापत होते. जणू काही ती बर्फाळ प्रदेशातूनच आलीय अशी तिची अवस्था झाली होती. त्यामुळे तिला शुद्धीवर येण्यासाठी दोन तास लागले. शुद्धीवर आल्यावर तिने तो थरारक प्रसंग सांगितला. लियू नसता आला तर मी थंडीने कुडकुडत मेले असते, असं ती म्हणाली. लियूने जीव वाचवल्याने तिने लियूला थेट आपल्या कंपनीचे अर्धे शेअर्स फुकट दिले. त्याला आपल्या कंपनीचा भागिदार बनवला. तिने ही दिलदारी दाखवताना मागचा पुढचा कोणताही विचार केला नाही. तिच्या या दिलदारीमुळे लियूचं नशिब मात्र फळफळलं.