AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Desi Jugaad | अशी गाडी तुम्ही कधीच पाहिली नसावी, गुजरातमधील व्हिडीओ व्हायरल!

देसी जुगाडचे अनेक व्हिडीओ तुम्ही आजवर पाहिले असतील. हा व्हिडीओ थोडा हटके आहे. गुजरातमधील सुरतचा हा व्हिडीओ आहे. मोनोसायकल बनवताना या माणसाने जबरदस्त जुगाड लावलाय. रस्त्यावर ही गाडी बघून सगळेच चक्रावलेत. सोशल मीडियावर या व्हिडिओला 8.3 मिलियन व्यूज आणि 367,000 लाइक्स मिळालेत. ही मोनोसायकल बघून वाटतं, जुगाड करताना लोक काहीही करू शकतात.

Desi Jugaad | अशी गाडी तुम्ही कधीच पाहिली नसावी, गुजरातमधील व्हिडीओ व्हायरल!
mono cycle
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Oct 14, 2023 | 8:48 AM
Share

मुंबई: भारतात जुगाड खूप चालतो. जुगाड करताना खर्च कमी, डोकं जास्त आणि पटकन आपलं काम होईल असं बघितलं जातं. जुगाड करणं दिसतं तितकं सोपं तर कधीच नसतं. त्यासाठी एखाद्याला डोकं हवं. असे अनेक जुगाडू व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ मोठमोठ्या लोकांकडून रिपोस्ट केले जातात. व्हिडीओ बघताना आपल्यालाच धक्का बसतो, आपल्यालाही प्रश्न पडतो “अरे हे असं कसं?” पण लोकं कमी खर्चात तो जुगाड बसवतात. याआधी देखील आपण असे अनेक व्हिडीओ पाहिलेत, यात कधी आपण जुगाड करून पंखा बनवलेला पाहिलाय तर कधी आपण मोटार बनवलेली पाहिली. हे जुगाड तंत्रज्ञान उलट लोकांच्या मदतीलाच येते. असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यात एका माणसाने एक विचित्र मोनोसायकल बनवलीये.

जुगाड बघून भलेभले चक्रावले

व्हिडीओ मध्ये तुम्ही बघू शकता की एक माणूस रस्त्याने एका गाडीवर चाललाय. ही गाडी बघण्यासारखी आहे. केशरी रंगाची ही गाडी रस्त्यावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतीये. बघताना असं वाटतं की हा माणूस एखाद्या खेळण्यात बसलाय. व्हिडीओ मध्ये “मुसाफिर हू यारो” हे गाणं लावलंय. ते गाणं खरंच त्या व्हिडिओला सूट होतंय. हा देसी जुगाड बघून भलेभले चक्रावलेत. सोशल मीडियावर या व्हिडिओला 8.3 मिलियन व्यूज आणि 367,000 लाइक्स मिळालेत. ही मोनोसायकल बघून वाटतं, जुगाड करताना लोक काहीही करू शकतात.

भरभरून कौतुक

एका मोठ्या चाकापासून ही गाडी बनवलीये. तुम्हालाही ही गाडी अचानक रस्त्यावर दिसली तर तुम्ही सुद्धा चक्रावून जाल. @iamsuratcity नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटने हा व्हिडीओ शेअर केलाय. ही मोनोसायकल बनवताना या व्यक्तीने त्याच्या घराच्या आजूबाजूच्या वस्तूंचा वापर केलाय. खूप शक्कल लावून त्याने ही मोनोसायकल बनवलीये. विशेष म्हणजे काय हा व्हिडीओ गुजरातमधील सुरतचा आहे. या गाडीचं सगळीकडून भरभरून कौतुक केलं जातंय.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार; संजय राऊत असं का म्हणाले?
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी...
Mumbai Rain Updates : मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी; वातावरणात गारवा
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला