AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali 2021 Video: चटक चांदणी, चतूर कामिनी, काय म्हणायचं हीला, ही आहे तरी कोण, बाई की लाईटचं दुकान?

नवीन कपडे घातल्यानंतर आपणही उजळून निघावं असं प्रत्येकाला वाटतं. पण असं करण्यासाठी कुणी थेट कपड्यांवरच रोषणाई केली तर..? ऐकूण आश्चर्य वाटलं असेल, पण असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे

Diwali 2021 Video: चटक चांदणी, चतूर कामिनी, काय म्हणायचं हीला, ही आहे तरी कोण, बाई की लाईटचं दुकान?
दिवाळीला लाईटची साडी
| Edited By: VN | Updated on: Nov 03, 2021 | 1:42 PM
Share

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण, कुठलंही घर असो, दिवाळीत ते उजळलं नाही असं होत नाही. त्यातच नवीन कपड्यांची खरेदी आली. जसं घर उजळतं, तसेच नवीन कपडे घातल्यानंतर आपणही उजळून निघावं असं प्रत्येकाला वाटतं. पण असं करण्यासाठी कुणी थेट कपड्यांवरच रोषणाई केली तर..? ऐकूण आश्चर्य वाटलं असेल, पण असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यात एक महिलेने थेट आपल्या नव्या साडीवर विद्युत रोषणाई केली आहे. जे पाहिल्यानंतर लोक हसून लोटपोट होत आहेत. ( diwali viral video Diwali 2021 Funny Video diwali latest video woman wearing saree with light)

हा व्हिडीओ बराच जुना आहे, मात्र दिवाळीच्या मुहू्र्तावर पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. पांढऱ्या फिक्कट रंगाच्या साडीत ही महिला कशी लुकलुकत आहे, हे पाहा. या महिलेकडे बघून असे वाटतं की, जणू तिने ही साडी स्वत:ला उजळवण्यासाठीच नेसली आहे. महिलेचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला असून लोक या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहेत.

पाहा व्हिडीओ:

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. सय्यद मोहम्मद रफी नावाच्या पेजवर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता.

सोशल मीडिया यूजर्सना हा व्हिडिओ खूप आवडलेला दिसतो आहे. काही लोक या व्हिडीओवर टीकाही करत आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की या महिलेला पाहून असे वाटते की, तिला दिवा लावण्याची गरज नाही. त्याचवेळी, काहींनी सांगितले की, तिच्या अंगावर तारा गुंडाळलेल्या आहेत. एका यूजरने कमेंट करताना लिहिले की, ‘असं दिसते की या मॅडमनी त्यांच्या घरात लायटिंग केलेली नसेल’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘ही बाई आहे की लाईट शॉप’?

हेही पाहा:

Viral Video: लिफ्टमध्ये कुत्र्याचा पट्टा अडकला, त्याला फास बसला, आणि त्यानंतर जे घडलं त्याने नेटकरी आवाक!

Video: 12 व्या मजल्यावर लिफ्ट अडकली, लिफ्टमधून बाहेर पडण्यासाठी चिमुरड्याचा तासभर संघर्ष, यूपीतील घटनेचं धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज

 

Follow Us
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी