डॉक्टर, काय प्रिस्क्रिप्शन लिहिलंय, वाचून दंग झाले पेशंट, नातेवाईक पण म्हणाले आम्ही असे पहिल्यांदाच पाहतोय

Doctor Prescription : समाज माध्यमावर गेल्या काही दिवसांपासून नोएडातील एका रुग्णालयामधील डॉक्टरने लिहिलेले प्रिस्क्रिप्शन व्हायरल झाले आहे. हे प्रिस्क्रिप्शन वाचून सर्वच दंग झाले आहेत. नातेवाईक पण गदगद झाले आहेत. काय आहे या प्रिस्क्रिप्शनमध्ये?

डॉक्टर, काय प्रिस्क्रिप्शन लिहिलंय, वाचून दंग झाले पेशंट, नातेवाईक पण म्हणाले आम्ही असे पहिल्यांदाच पाहतोय
प्रिस्क्रिप्शन व्हायरल
Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 09, 2025 | 4:19 PM

तुम्ही पण कधी ना कधी आजारी पडला असाल? आजारपणाच्या काळात अनेक जण दवाखाना जवळ करतात. तुम्हाला तपासल्यावर डॉक्टर एक चिठ्ठी लिहून देतात. त्याला प्रिस्क्रिप्शन म्हणतात. या चिठ्ठीवर तुमचे नाव, तारीख यासोबतच सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या आजारावरील औषधांची माहिती देण्यात येते. त्यावर हे औषध किती आणि कधी घ्यायचे याची पण माहिती देण्यात येते. ही चिठ्ठी घेऊन तुम्ही केमिस्ट, औषध विक्रेत्याकडे गेल्यावर तो लिहून दिलेली औषधी आपल्याला देतो.

औषध घेतल्यानंतर आपण पुन्हा डॉक्टरकडे जातो. डॉक्टर ती कशी घ्यायची याची माहिती देतो. तर कधी कधी केमिस्ट सुद्धा त्याविषयीची माहिती देतो. पण कधी कधी या प्रिस्क्रिप्शनवरील डॉक्टरांचे अक्षर काही कळत नाही, मग केमिस्ट कानावर हात ठेवतो. प्रिस्क्रिप्शनवरील हस्ताक्षर इतके किचकट असते की केमिस्ट वगळता ते भल्या भल्यांना कळत नाही. असे असतानाच सोशल मीडियावर एक प्रिस्क्रिप्शन व्हायरल होत आहे. ते पाहून रुग्णांचाच नाही तर नातेवाईकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

मोत्यासारखे हस्ताक्षर

नोएडा येथील फेलिक्स रुग्णालयातील एका डॉक्टरच्या हस्ताक्षरातील हे प्रिस्क्रिप्शन व्हायरल झाले आहे. कारण त्यावरील अक्षर हे मोत्यासारखे आहे. इंग्रजी हे प्रिस्क्रिप्शन असते. ते अत्यंत किचकट असते. ते साध्या व्यक्तीला कळतच नाही. पण ही व्हायरल प्रिस्क्रिप्शन वाचणे अत्यंत सोपे आहे. कारण ती हिंदीत लिहिली आहे. ते अक्षर ही सुरेख आणि सुंदर आहे. त्यातील एक एक शब्द वाचता येतो. हे प्रिस्क्रिप्शन वाचल्यानंतर अनेक जण डॉक्टराला देव म्हणत आहेत.

प्रिस्क्रिप्शन फार जुने

व्हायरल होत असलेले हे प्रिस्क्रिप्शन जुने आहे. वर्ष 2022 मध्ये हिंदी दिवसाचे औचित्य साधत डॉक्टरने ही चिठ्ठी लिहिली. त्या दिवशीच्या सर्व प्रिस्क्रिप्शन हिंदी भाषेत लिहिल्या गेल्या होत्या. त्या दिवशीची ही चिठ्ठी पुन्हा व्हायरल झाली आहेत. कारण रुग्णांना सुद्धा त्यांच्या आजाराची माहिती आणि त्यावरील औषधाची माहिती मिळणे आवश्यक आहे.