Video: पावसात भिजणाऱ्या, आनंदाने बागडणाऱ्या कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, असाच कुत्रा पाळायला हवा!

मुसळधार पाऊस पडत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि व्हिडिओमध्ये दिसणारा कुत्रा त्या पावसाच्या पाण्याचा आनंद घेत आहे. व्हिडिओमध्ये तो कुत्रा कधी धावतो, कधी उड्या मारतो आणि मध्येच पावसाचे पाणी पीत आहे.

Video: पावसात भिजणाऱ्या, आनंदाने बागडणाऱ्या कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, असाच कुत्रा पाळायला हवा!
पावसात भिजणाऱ्या कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ इतके मजेदार असतात की, ते पुन्हा पुन्हा पाहवे वाटतात आणि त्यातील असेही काही असे असतात जे पाहून आश्चर्य वाटतं. कधी-कधी प्राणी अशा गोष्टी करतात, ज्याला पाहून प्रत्येकजण विचारात पडतो. सोशल मीडियावर कुत्र्यांचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. आम्हाला खात्री आहे की, ज्यांना कुत्रे खूप आवडतात त्यांना हा व्हिडिओ खरोखर आवडेल,. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक कुत्रा दिसत आहे, जो पावसाच्या पाण्याचा खूप आनंद घेत आहे. (Dog Funny Video of cute dog was seen jumping in the heavy rain the heart is winning the video)

मुसळधार पाऊस पडत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि व्हिडिओमध्ये दिसणारा कुत्रा त्या पावसाच्या पाण्याचा आनंद घेत आहे. व्हिडिओमध्ये तो कुत्रा कधी धावतो, कधी उड्या मारतो आणि मध्येच पावसाचे पाणी पीत आहे. हा व्हिडीओ सर्वांनाच आकर्षित करणारा आहे. हा व्हिडीओ पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, हा कुत्रा हा क्षण खूप एन्जॉय करत आहे. हा व्हिडिओ सर्वांची मनं जिंकत आहे.

व्हिडीओ पाहा:

View this post on Instagram

A post shared by ViralHog (@viralhog)

हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही व्हायरल हॉगच्या पेजवर सर्व व्हिडिओ पाहू शकता. हा व्हिडिओ काही तासांपूर्वी सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे. त्याला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्येही हजारो कमेंट्स पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ शेअर करताना पेजच्या अॅडमिनने कॅप्शनमध्ये लिहिले, एक आनंदी कुत्रा पावसात खेळताना दिसतो🐶🌧♥

या व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलताना, एका युजरने कमेंट केली, किती क्यूट!!!!! या कुत्र्याला पाऊस आवडतो, दुसर्‍या यूजरने लिहिले, गोड बाळ, तो खरोखर आनंदी दिसत आहे. तिसर्‍या युजरने लिहिले, मला तुमचे हे पेज खूप आवडते.

हेही पाहा:

Video: प्रियकराचं प्रियसीला पाळीव कुत्र्यासमोर अनोखं प्रपोज, पाहा अविस्मरणीय क्षणाचा व्हायरल व्हिडीओ

Cobra Video | अजब गावात गजब प्रकार, नागाने जबड्यातून बाहेर काढला मृत घोणस, कोल्हापुरात चर्चा

Published On - 4:36 pm, Wed, 8 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI