Video: प्रियकराचं प्रियसीला पाळीव कुत्र्यासमोर अनोखं प्रपोज, पाहा अविस्मरणीय क्षणाचा व्हायरल व्हिडीओ

सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणा्त व्हायरल होत आहे, जो तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या मैत्रिणीला लग्नासाठी प्रपोज करताना दिसत आहे.

Video: प्रियकराचं प्रियसीला पाळीव कुत्र्यासमोर अनोखं प्रपोज, पाहा अविस्मरणीय क्षणाचा व्हायरल व्हिडीओ
तरुणाने आपल्या पाळीव कुत्र्यासमोरच प्रियसीला प्रपोज केलं.

प्रेम हे जगातील सर्वात सुंदर गोष्टींपैकी एक मानलं जातं, नात्यात प्रेम असेल तर कसलीही गरज लागत नाही. सोशल मीडियावर अनेक प्रेमाने भरलेले व्हिडिओही पाहायला मिळतात, ज्यांनी तुमच्या हृदयात नक्कीच जागा निर्माण करतात. हे व्हिडिओ इतके गोंडस असतात की, तुम्हाला ते पुन्हा पुन्हा पाहायला आवडतात. जे लोक प्रेमात असतात, ते त्यांचे प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेकदा असे मार्ग वापरतात, जे जोडीदाराच्या नेहमी लक्षात राहतील. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्रेम व्यक्त करतानाचा साक्षीदार चक्क कुत्रा आहे. (Viral Video of Man proposes to his girlfriend on a beach and their dog reaction)

सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणा्त व्हायरल होत आहे, जो तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या मैत्रिणीला लग्नासाठी प्रपोज करताना दिसत आहे. यावेळी त्याच्या आनंदात सोनी नावाचा एक सुंदर सोनेरी कुत्रा देखील सामील होतो, तेव्हा त्याच्यासाठी असलेला हा क्षण आणखी खास बनतो. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रिट्रीव्हर कुत्रा देखील त्याच्या मालकासोबत त्याच्या भावना आणि उत्साह व्यक्त करत आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Good News Dog (@goodnewsdog)

व्हिडिओमध्ये हा माणूस त्याच्या मैत्रिणीला प्रपोज करतो. मात्र, तिचा प्रियकर कॅमेरामध्ये टायमर लावून सेल्फी घेत आहे, असे तिच्या मैत्रिणीला वाटते, त्यामुळे ती सेल्फी काढत उभी राहते आणि तिचा कुत्राही त्या फ्रेममध्ये बसलेला असतो. मग काही क्षणांनंतर हा तरुण त्याच्या गुडघ्यावर बसतो आणि त्याच्या मैत्रिणीला अंगठी देतो. अंगठी पाहून गर्लफ्रेंड खूप आनंदी होते आणि तिचा कुत्रा देखील खूप आनंदी दिसत आहे.

हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही गुडन्यूजडॉग नावाच्या पेजवर सर्व व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओवरील लाईक्सवरून तुम्ही अंदाज लावू शकता की हा व्हिडिओ लोकांना किती आवडला आहे. आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, तसेच व्हिडिओवर अनेक कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. एका युजरवर कमेंट करताना लिहिले , जर मी या मुलीच्या जागी असते, तर मी लगेच हो म्हटले असते. आणखी एका यूजरने लिहिले, कुत्रा मुलीपेक्षा जास्त आनंदी दिसत आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये हजारो लोकांनी इमोजीही शेअर केले आहेत.

हेही पाहा:

Cobra Video | अजब गावात गजब प्रकार, नागाने जबड्यातून बाहेर काढला मृत घोणस, कोल्हापुरात चर्चा

Video: चक्क मांजरीला रस्ता ओलांडून देण्यासाठी गाड्या थांबवल्या, वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल!

Published On - 3:35 pm, Wed, 8 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI