Video: चक्क मांजरीला रस्ता ओलांडून देण्यासाठी गाड्या थांबवल्या, वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल!

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, कसे ट्रॅफिक पोलीस हाताच्या इशाऱ्याने वाहने थांबवतो आणि मांजरीला रस्ता ओलांडून देतो.

Video: चक्क मांजरीला रस्ता ओलांडून देण्यासाठी गाड्या थांबवल्या, वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल!
मांजरीला रस्ता ओलांडून देताना वाहतूक पोलीस

सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात काही हसवतात, तर काही आश्चर्यचकित करतात. याशिवाय हृदयाला स्पर्श करणारे काही व्हिडिओ आहेत. लोकांना शिकवण्याचं काम हे व्हिडीओ करत असतात. आयुष्य कसं जगलं पाहिजे, हे व्हिडीओ पाहिल्यानंतर कळतं. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो तुम्हाला नक्कीच आवडेल (Viral Video of Traffic policeman stopped the vehicles and started getting cat to cross the road cute Cat video viral)

हा व्हिडीओ एका मांजर आणि ट्रॅफिक पोलिसाचा आहे, वाहतूक पोलिसांचे काम वाहनांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचंच असते, जेणेकरून रस्त्यावर कुठंही वाहतूक कोंडी होणार नाही आणि लोकांना कोणतीही अडचण येणार नाही. कधी-कधी हे पोलीस लोकांना रस्ता ओलांडायला मदतही करतात, तुम्ही अनेकदा असे व्हिडीओही पाहिले असतील. पण तुम्ही कधी ट्रॅफिक पोलीसाला मांजरीला रस्ता ओलांडून देताना पाहिलं आहे का? कदाचित पाहिलं नसेल, कारण अशा घटना क्वचितच पाहायला मिळतात, पण व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असंच काहीसं पाहायला मिळतंय.

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, कसे ट्रॅफिक पोलीस हाताच्या इशाऱ्याने वाहने थांबवतो आणि मांजरीला रस्ता ओलांडून देतो. या दरम्यान, मांजर देखील त्याच्या मागे चालत अतिशय आरामात रस्ता ओलांडते. हा एक अतिशय अनोखा व्हिडीओ आहे.

व्हिडीओ पाहा:

View this post on Instagram

A post shared by MeoW🧶 (@cattt.meoww)

हा अप्रतिम आणि हृदयस्पर्शी व्हिडिओ इन्स्टाग्रामवर cattt.meoww नावाने शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 11 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे. त्याचबरोबर अनेकांनी व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, ‘आजच्या जगात काहीहीही होऊ शकतं’, तर अनेकांनी पोलिसाचे कौतुक केले आहे.

हेही पाहा:

Video: ‘अपनी गली मैं कुत्ता शेर’, पण दुसऱ्याचं गल्लीत गेल्यावर कुत्र्याची काय हालत होते?, पाहा पोट धरुन हसवणारा व्हिडीओ

Video: गुडघाभर पाण्यात सूर मारायला गेला, आणि तोंडावर आपटला, व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल!

Published On - 6:20 pm, Tue, 7 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI