बिल गेट्स यांना टपरीवर चहा पाजणारा डॉली बुर्ज खलिफामध्ये पितोय कॉफी, लोकं म्हणाले मौज कर दी

नागपुरचा डॉली चायवाला आता अनेकांना माहित झाला आहे. त्याचे अनेक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. डॉली चायवाला याच्या टपरीवर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स देखील चहा पिण्यासाठी आले होते. तोच डॉली चायवाला आता दुबईत फिरण्यासाठी गेला आहे.

बिल गेट्स यांना टपरीवर चहा पाजणारा डॉली बुर्ज खलिफामध्ये पितोय कॉफी, लोकं म्हणाले मौज कर दी
Follow us
| Updated on: Apr 22, 2024 | 7:32 PM

डॉली चायवालाची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, लोकं आता त्याला फॉलो करु लागले आहेत. भारताबाहेरही त्याचा जलवा कायम आहे. त्याच्या फॉलोअर्सची संख्या वाढतच चालली आहे. सोशल मीडियावरही डॉली चायवाला चांगलाच चर्चेत असतो. पण तुम्हाला माहित आहे का की अनोख्या स्टाईलमध्ये चहा सर्व्ह करणाऱ्यांना डॉलीला कॉफी प्यायला आवडते. डॉलीने जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा येथे कॉफीचा आस्वाद घेतला. तो अनेकदा कुठेतरी टूरवर जातो पण त्याच्या दुबई टूरचा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ त्याने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये डॉली चहावाला एका आलिशान कारमधून खाली उतरताना दिसत आहे. त्याच्या स्वागतासाठी दोन जणं आधीच उभे आहेत. सर्वजण नंतर बुर्ज खलिफाच्या शिखरावर जातात आणि एकत्र बसतात आणि कॉफी पितात. हा व्हिडिओ शेअर करताना डॉलीने लिहिले की – ‘कॉफी प्यायला बुर्ज खलिफाच्या शिखरावर गेलो होतो.’

डॉली चायवालाच्या या व्हिडिओला 10 लाखांहून अधिक लाईक्स आणि 13 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. त्याच्या या व्हिडिओवर अनेक युजर्सनी कमेंटही केल्या आहेत. उद्योगपती बिल गेट्स यांनी त्याच्या टपरीवर चहा पिल्यानंतर तो आणखी प्रसिद्ध झाला. या वर्षी फेब्रुवारीमध्ये बिल गेट्स यांनी भारत भेटीदरम्यान त्यांच्या स्टॉलला भेट दिली होती.

डॉलीच्या दुबई दौऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. एका रात्रीत प्रसिद्ध होतात तशी या डॉली चहावाल्याची स्टोरी आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.