VIDEO : हॅण्डल ते मडगार्ड, एका बाईकवर किती मुलं बसली?

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती डझनभर मुलांना बाईकवर घेऊन, मोठ्या आनंदात रस्त्यावरून जात आहे. व्हिडीओमध्ये सर्व मुले 'बचपन का प्यार' हे गाणे गात असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

VIDEO : हॅण्डल ते मडगार्ड, एका बाईकवर किती मुलं बसली?
एका बाईकवर किती मुलं बसली?
| Edited By: | Updated on: Sep 13, 2021 | 10:45 AM

मुंबई : इंटरनेटच्या जगात कॉमेडी व्हिडिओंची एक मालिकाच आहे. युजर्स त्यावर भरभरुन प्रेम करतात. असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. पण कधीकधी लोक प्रसिद्ध होण्यासाठी अशा काही गोष्टी करतात, लोक त्यांना पाहून आश्चर्यचकित होतात. असाच एक व्हिडिओ अलीकडच्या काळात समोर आला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती दुचाकीवर डझनभर मुलांना बसवून ती दुचाकी चालवत आहे.

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती डझनभर मुलांना बाईकवर घेऊन, मोठ्या आनंदात रस्त्यावरून जात आहे. व्हिडीओमध्ये सर्व मुले ‘बचपन का प्यार’ हे गाणे गात असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अनेक मुले या दुचाकीवर बसलेली आहेत. जर बाईकवरील मुलांची संख्या मोजायची झाली तर त्यांची संख्या डझनापेक्षा जास्त असेल. डझनभर मुलं एकाच बाईकवर कशी काय बसू शकतात असा प्रश्न पडला असेल तर हा व्हिडीओ पाहा. कोणी हॅण्डलवर, कोणी मडगार्डवर, कोणी पेट्रोल टाकीवर बसले आहेत. पाच मुलं पेट्रोल टाकीवर बसलेत ,कुणी हाताला लोंबकळत आहे, कुणी खांद्यावर बसलंय, तर चार मुलं मागच्या सीटवर बसली आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप धमाल उडवत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी गमतीशीर कमेंट्स केल्या. एका युजरने म्हटलंय, “याला पकडा आणि याची चांगली धुलाई करा, मुलांच्या आयुष्याशी खेळ का?”

दुसरा युजर म्हणतो, स्टंटबाजीच्या नादात चिमुकल्यांच्या जीवाशी खेळू नका. तर कोणी म्हणतो, चालानची राहू दे पण यमराजाची तरी भीती बाळगा.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर giedde या अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओ हजारो युजर्सनी पाहिला आहे.

VIDEO :

संबंधित बातम्या 

Video: स्टंट करताना स्टाईल दाखवत होता, तरुणाचं स्केटबोर्डवरचं नियंत्रण सुटलं, पुढं काय घडलं नक्की पाहा