Video: स्टंट करताना स्टाईल दाखवत होता, तरुणाचं स्केटबोर्डवरचं नियंत्रण सुटलं, पुढं काय घडलं नक्की पाहा

सध्याच्या तरुणाईला स्टंट करण्याची फार हौस असते, तरुणांमध्ये स्टंटची मोठी क्रेझ आहे. अनेकदा स्टंट करण्याच्या नादात तरुण जीव धोक्यात घालतं असल्याचं समोर आलेलं आहे.

Video: स्टंट करताना स्टाईल दाखवत होता, तरुणाचं स्केटबोर्डवरचं नियंत्रण सुटलं, पुढं काय घडलं नक्की पाहा
Stunt Viral Video


सध्याच्या तरुणाईला स्टंट करण्याची फार हौस असते, तरुणांमध्ये स्टंटची मोठी क्रेझ आहे. अनेकदा स्टंट करण्याच्या नादात तरुण जीव धोक्यात घालतं असल्याचं समोर आलेलं आहे. काही प्रकरणांमध्ये तर तरुणांनी जीव गमवाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. काही घटनांमध्ये स्टंट करणाऱ्या तरुणांची फजिती होती, त्यामुळे अनेकदा पाहणाऱ्यांना देखील हसू आवरत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हिडीओ पाहून लोकांना हसू अनावर

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एक तरुण टेकडीवरुन खाली जाण्यासाठी स्केट बोर्डचा वापर करत असताना दिसून येतोय. मोठ्या आनंदात तो स्केटिंग करत असल्याचं व्हिडीओत दिसतंय. मात्र, एका वेळी त्याचं संतुलन बिघडतं आणि त्याचा स्टंट खराब होतो. हा व्हिडीओ पाहून अनेक लोक त्यांचं हसू आवरू शकलेले नाहीत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.


व्हिडीओत आपण पाहू शकता की एक व्यक्ती स्केट बोर्डशी स्टंट करण्याचा प्रयत्न करतेय. टेकडीवरून खाली जाणाऱ्या रस्त्यावर त्याचा स्टंट सुरु आहे. स्टंट सुरु असताना तो त्याचा स्वॅग दाखवण्याचा प्रयत्न करतोय.एका वेळी स्केटिंग करता करता गोल गोल फिरण्यास सुरुवात करतोय. ज्यावेळी तो खाली येण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळी त्याचे हात सुटतात आणि तो करत असलेली मेहनत वाया जातो.

नेटकऱ्यांचे सल्ले

सोशल मीडियावरील काही लोक त्याचं कौतुक करत आहेत. तर, काही लोक त्याला सुनावताना दिसत आहेत. स्टंट दाखवताना स्वॅग मारु नये, असा सल्ला देत आहेत. एका युजरनं कमेंट करुन स्टंट चांगला होता मात्र, स्टाईल मारण्याच्या नादात बर्बाद झाला, असं म्हटलंय. तर, एका नेटकऱ्यानं पुढील वेळी चांगला प्रयत्न कर, यश नक्की मिळेल, असं म्हटलंय . आणखी काही नेटकऱ्यांनी देखील स्टंटच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर कमेंटचा पाूस पाडला आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ ट्विटरवर @HldMyBeer नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला नेटकऱ्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे.

इतर बातम्या:

Video | तरुणांचा लग्नमंडपात भन्नाट डान्स, काही क्षणांत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

VIDEO : सूनेची सासूला मारहाण, कॅमेऱ्यासमोर कानशिलात, घरातला कलह सोशल मीडियावर व्हायरल

Video | उत्सुक नवरदेवाची घोर निराशा, जिवलग मित्राने केली अजब मस्करी, गिफ्टमध्ये नेमकं काय ?

हेही पाहा

Viral video of man showing style while doing stunt people laugh after watching this video

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI