Video | उत्सुक नवरदेवाची घोर निराशा, जिवलग मित्राने केली अजब मस्करी, गिफ्टमध्ये नेमकं काय ?

मित्राने दिलेले गिफ्ट नवरदेव उत्सुकतेने उघडत आहेत. या गिफ्टवर एकावर एक आवरणं आहेत. एक आवरण उघडल्यानंतर लगेच दुसरे आवरण दिसत आहे. हे आवरण काढून काढून नवरदेव दमला आहे.

Video | उत्सुक नवरदेवाची घोर निराशा, जिवलग मित्राने केली अजब मस्करी, गिफ्टमध्ये नेमकं काय ?
groom bride marriage video

मुंबई : लग्न समारंभातील व्हिडीओ मजेदार आणि मूड फ्रेश करणारे असतात. कदाचित याच कारणामुळे अशा व्हिडीओंना आवडीने पाहिले जाते. सध्या तर एका लग्नातील व्हिडीओ अतिशय व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी खळखळून हसत आहेत. (groom friends gave funny gift on occasion of marriage video went viral on social media)

व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा विशेष आहे. कारण या व्हिडीओमध्ये नवरदेवाच्या मित्रांनी त्याची कशाप्रकारे मस्करी केलीय, हे दाखवण्यात आले आहे. नवरदेवाच्या मित्रांनी त्याला एक अनोखं गिफ्ट दिलं आहे. हे गिफ्ट पाहून नेटकरी खळखळून हसत आहेत.

भेटवस्तू पाहण्यास नवरदेव उत्सूक

व्हिडीओमध्ये नवरी आणि नवरदेव उभे असल्याचं दिसतंय लग्नसमारंभ पार पडला आहे. त्यामुळे फोटोसेशन सुरु आहे. दोघांचेही मित्रमंडळी आनंदात फोटो काढत आहेत. यावेळी नवरदेावाचे मित्र आले आहेत. यातीलच एका मित्राने नवरदेवाला भेटवस्तू दिली असून ती स्टेजवरच उघडायला सांगितली आहे. ही भेटवस्तू उघडत असताना नवरदेव उत्सुक आहे. माझ्या मित्राने मला काय भेट दिली असेल, हे जाणून घेण्यासाठी नवरदेव आतूर झाला आहे.

नवरदेवाची घोर निराशा

मित्राने दिलेले गिफ्ट नवरदेव उत्सुकतेने उघडत आहेत. या गिफ्टवर एकावर एक आवरणं आहेत. एक आवरण उघडल्यानंतर लगेच दुसरे आवरण दिसत आहे. हे आवरण काढून काढून नवरदेव दमला आहे. शेवटी संपूर्ण गिफ्ट खोलल्यानंतर नवरदेवाला काहीही सापडलेले नाही. मित्राने दिलेले गिफ्ट रिकामेच राहिले आहे. नवरदेवाची घोर निराशा झाली आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ पाहून नेटकरी लोटपोट

मित्राने दिलेल्या बॉक्समध्ये काहीच नसल्यामुळे नवरदेवाची घोर निराशा झाली आहे. मित्राने केलेली मस्करी पाहून नवरदेव तसेच नवरीलाही हसू आल्याचं आपल्याला व्हिडीओमध्ये दिसतंय. हा व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा हसून हसून लोटपोट झाले आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. लोक या व्हिडीओवर मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. सध्या हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर official_niranjanm87 या अकाऊंटवर पाहता येईल.

इतर बातम्या :

Video | माशांची जागा घेतली माकडांनी, जिकडे तिकडे पोहताना दिसले, नेटकरी अवाक्, व्हिडीओ व्हायरल

Video | मेहुणीने काढली नवरदेवाची खोड अन् सगळीकडे हशा पिकला, पाहा नेमकं काय घडलं ?

VIDEO : 73 वर्षांच्या आजोबांची स्केटबोर्डवर धमाल!, व्हिडीओ पाहून व्हाल चकीत

(groom friends gave funny gift on occasion of marriage video went viral on social media)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI