Video | नवरी, नवरदेवासमोर तरुणाचा भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

नवी जोडी स्टेजवर उभी राहिल्यामुळे सगळे नातेवाईक खाली खुर्चीवर बसल्याचे दिसतेय. यावेळी एक तरुण नवरी-नवरदेवाकडे आला आहे. तसेच त्याने दोघांसमोर येऊन थेट डान्स सुरु केलाय.

Video | नवरी, नवरदेवासमोर तरुणाचा भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
young boy dance viral video


मुंबई : लग्न समारंभ म्हटलं की मौजमजा आलीच. लग्नामध्ये नवरी-नवरदेवापासून ते नातेवाईकांपर्यंत सगळेच धम्माल मस्ती करतात. या दिवशीचं वातावरण वेगळंच असतं. विशेष म्हणजे लग्नाच्या दिवशी डान्स तर हमखास असतो. या डान्सचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ नंतर चर्चेचा विषय ठऱतात. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून नेटकरी वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. (young boy dancing in front of bride and groom video went viral on social media)

नवरी-नवरदेवासमोर तरुणाचा भन्नाट डान्स

व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा विशेष आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण नवरी-नवरदेवासामोरच नाचत आहे. विशेष म्हणजे तो थेट स्टेजवर चढला असून कसलीही चिंता न करता तो मजेदार डान्स करताना दिसतोय. तरुणाचे हावभाव तसेच डान्सच्या स्टेप्स पाहण्यासारख्या आहेत.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नवरी आणि नवरदेव उभे आहेत. दोघांनीही साज चढवला असून ते सुंदर दिसत आहेत. नवी जोडी स्टेजवर उभी राहिल्यामुळे सगळे नातेवाईक खाली खुर्चीवर बसल्याचे दिसतेय. यावेळी एक तरुण नवरी-नवरदेवाकडे आला आहे. तसेच त्याने दोघांसमोर येऊन थेट डान्स सुरु केलाय. तो शाहरुख खान, सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्या चित्रपटातील ‘उस घर मे खुशहाली आये, जिस घर मे तुम्हारी शादी हो’ या गाण्यावर डान्स करत आहे. नवरी-नवकदेवाकडे पाहत तसेच वेगवेगळे हावभाव करत हा तरुण डान्स करत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

हा डान्स पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने हा तर जुना प्रेमी दिसतोय अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने हा डान्स मला खूप आवडला असे म्हणत तरुणाला प्रोत्साहन दिले आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

इतर बातम्या :

VIDEO : पत्नीने कामाला लावल्याने नवरा वैतागला, त्यानं असं काही केलं की ते पाहून तुम्हीही पोट धरून हसाल!

Haryanvi Dance Song: ‘बिजली’ बनून स्टेजवर घातला धुमाकूळ, गोरी नागौरीचा हाय वोल्टेज हरयाणवी डान्स पाहिलात का?

Video | तरुणाचं मोबाईलमध्ये डोकं, अचानकपणे समोर आला कोब्रा, पुढं जे झालं ते एकदा पाहाच !

(young boy dancing in front of bride and groom video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI