VIDEO : पत्नीने कामाला लावल्याने नवरा वैतागला, त्यानं असं काही केलं की ते पाहून तुम्हीही पोट धरून हसाल!

नवरा-बायकोचे नाते खूप वेगळे असते. या नात्यामध्ये रूसवे, फुगवे, प्रेम आणि भांडणे नेहमीच होतात. त्यांच्यामध्ये जितके जास्त प्रेम असेल तितके अधिक भांडणे होतात. नवरा -बायकोशी संबंधित जोक्स, मीम्स आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

VIDEO : पत्नीने कामाला लावल्याने नवरा वैतागला, त्यानं असं काही केलं की ते पाहून तुम्हीही पोट धरून हसाल!
नवरा बायकोचा मजेदार व्हिडीओ व्हायरल

मुंबई : नवरा-बायकोचे नाते खूप वेगळे असते. या नात्यामध्ये रूसवे, फुगवे, प्रेम आणि भांडणे नेहमीच होतात. त्यांच्यामध्ये जितके जास्त प्रेम असेल तितके अधिक भांडणे होतात. नवरा -बायकोशी संबंधित जोक्स, मीम्स आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
(Husband-wife Funny video goes viral on social media)

सध्या सोशल मीडियावर असाच एक नवरा-बायकोचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ तुम्ही बघितल्यानंतर पोट धरून हसाल. या व्हिडीओमध्ये बायको आपल्या नवऱ्याला घरातील अनेक कामे सांगते. बायकोने सांगितलेले काम करून नवरा दोन मिनिटे बसला ना बसला की, बायको लगेचच दुसर काम नवऱ्याला सांगते आहे.  बायकोच्या या कामांना कंटाळून हे कामे टाळण्यासाठी नवरा एक शक्कल लडवतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by hepgul5 (@hepgul5)

हेच या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. सुरूवातील बायको नवऱ्याला घरातील भांडे घासण्यास सांगते. ते झाल्यावर कपडे धुण्यास सांगते. बायकोच्या सततच्या कामामुळे त्रस्त झालेल्या, नवऱ्याच्या मनात एक मजेदार कल्पना येते. बायको येऊन त्याला पुढील काम देण्यापूर्वी, पती लगेच तिची नेल पॉलिश घेऊन नखांवर लावतो. दरम्यान, जेव्हा त्याची बायको काही काम घेऊन त्याच्याकडे येते तेव्हा पती हातवारे करतो की तो नेल पॉलिश लावत आहे.

काम न करण्यासाठी आपल्या नवऱ्याने कशाप्रकारची शक्कल लडवली हे पाहून बायकोला देखील हसू येते. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर hepgul5 नावाच्या अकाऊंडवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. काही तासातच 4 हजार लोकांनी तो व्हिडीओ लाईक केला आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे. लोक मजेदार इमोजीसह व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया देत आहेत.

संबंधित बातम्या : 

Haryanvi Dance Song: ‘बिजली’ बनून स्टेजवर घातला धुमाकूळ, गोरी नागौरीचा हाय वोल्टेज हरयाणवी डान्स पाहिलात का?

बाप सरपंच असला तरी पोर बोलतं हवा फक्त आपलीच! अमित ठाकरेंचा साधेपणा दाखवणारा फोटो व्हायरल

Video | कुंपणाच्या बाहेर पडण्यासाठी धडपड, हुशार गाढवाची डोकॅलिटी, नेमकं काय केलं पाहाच !

(Husband-wife Funny video goes viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI