Video | प्रेम कोणावर करावं ? तरुणांनो इंदोरीकर महाराजांचा हा व्हिडीओ पाहाच, हसून लोटपोट व्हाल !

इंदोरीकर महाराजांचा प्रेम कसं आणि कुणावर करावं, हे सांगणारा एक अतिशय मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हसून-हसून लोटपोट व्हाल.

Video | प्रेम कोणावर करावं ? तरुणांनो इंदोरीकर महाराजांचा हा व्हिडीओ पाहाच, हसून लोटपोट व्हाल !
indurikar maharaj


मुंबई : कीर्तनकार इंदोरीकर महाराज माहिती नाहीत असं एकही नाव तुम्हाला सापडणार नाही. त्यांची विनोदबद्धी तसेच कीर्तनाची विशेष पद्धत यामुळे त्यांचा राज्यात मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी केलेल्या कीर्तनांचे कित्येक व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असतात. सध्या तर प्रेम कसं आणि कुणावर करावं, हे सांगणारा त्यांचा एक अतिशय मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हसून-हसून लोटपोट व्हाल. (indurikar Maharaj funny kirant on love and lovers see viral video)

इंदोरीकर महाराजांचे प्रेमावर मिश्किल भाष्य

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये इंदोरीकर महाराज प्रेमावर मिश्किल भाष्य करताना दिसत आहेत. त्यांनी प्रेम कोणावर करावं हे मजेदार पद्धतीने सांगितलं आहे. तसेच आपण कोणाशी संगत करावी, कसल्या लोकांमध्ये बसावं ? हेसुद्धा इंदोरीकर महाराज सांगताना दिसतात. हा व्हिडीओ newj या फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आला आहे. कोरोना महारामारीच्या आधीचा हा व्हिडीओ असावा असा अंदाज लावला जात आहे. या व्हिडीओमध्ये शेकडो लोक इंदोरीकर यांचे कीर्तन ऐकत आहेत. तसेच सर्व श्रोते पोट धरून हसताना आपल्याला दिसत आहेत.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

चर्चेत आलेल्या या व्हिडीओमध्ये इंदोरीकर महाराज प्रेमाविषयी बोलत आहेत. तरुण-तरुणींनी कोणावर प्रेम करावे ? कोणावर करु नये ? याबद्दल ते सांगत आहेत. प्रेम करायचं तर मोठ्याशी करायचं. किरकोळ लोकांच्या नादाला लागायचं नाही. रावणाने बायको पळवली पण देवाचीच. पण आपलं वेडं कोणाच्याही नादी लागतं. प्रेम करायचं असेल तर मोठ्याशी करायचं, असे अंदोरीकर महाराज सांगताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ :

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराज यांच्यावर खटला

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. इंदोरीकर महाराजांचे असे अनेक व्हिडीओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतील. ते समाजमाध्यमावर प्रसिद्ध असले तरी त्यांच्या काही वक्तव्यांमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत. “स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते” असं वादग्रस्त वक्तव्य महाराज इंदोरीकर यांनी यापूर्वी केले होते. याच वक्तव्यामुळे इंदोरीकर महाराज यांच्यावर संगमनेर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता.

इतर बातम्या :

Video | फिरायला जाण्यासाठी महिला बाहेर पडली, अचानकपणे सापाचा हल्ला, थरार कॅमेऱ्यात कैद

Video | मशीन बंद पडल्यानंतर कामगारांचं भन्नाट जुगाड, नेमकं काय केलं ? एकदा पाहाच !

Video | लग्न थाटामाटात, पण सासरला जाताना खवळली, नवरीने लगावली नवरदेवाच्या कानशिलात, व्हिडीओ व्हायरल

(indurikar Maharaj funny kirant on love and lovers see viral video)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI