AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | फिरायला जाण्यासाठी महिला बाहेर पडली, अचानकपणे सापाचा हल्ला, थरार कॅमेऱ्यात कैद

चौवा त्यांच्या घराच्या बाहेर पडल्या होत्या. त्यावेळी घरासमोर असलेल्या भिंतीमधून साप खाली जमिनीवर पडला. चौवा बाहेर येताच हा सापदेखील खाली पडला आहे. तसेच सापाने चौवा यांचा चावा घेण्याचादेखील प्रयत्न केला आहे.

Video | फिरायला जाण्यासाठी महिला बाहेर पडली, अचानकपणे सापाचा हल्ला, थरार कॅमेऱ्यात कैद
snake viral video
| Edited By: | Updated on: Sep 10, 2021 | 10:09 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ चर्चेत येईल हे सांगता येत नाही. या मंचावर कधी प्राणी, पक्ष्यांचा व्हिडीओ व्हायरल होतो. तर कधी माणसाच्या करामती चर्चेचा विषय ठरतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तर वेगळाच प्रसंग दाखवण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेवर सापाने हल्ला केल्याचंं दिसतंय. सापाने हल्ला करतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. (snake jumps on woman tries to attack terrible video went viral on social media)

चौवा घराबाहेर पडताच सापाचा हल्ला 

मिळालेल्या माहितीनुसार व्हायरल होत असलेला व्हिडीओ टेक्सास येथील आहे. यामध्ये चौवा स्मिथ लेकॉम्प्टे (Fourth Smith Lecompte) या महिलेवर सापाने हल्ला केल्याचं दिसतंय. हा सगळा प्रसंग घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. चौवा त्यांच्या घराच्या बाहेर पडल्या होत्या. त्यावेळी घरासमोर असलेल्या भिंतीमधून साप खाली जमिनीवर पडला. चौवा बाहेर येताच हा सापदेखील खाली पडला आहे. तसेच सापाने चौवा यांचा चावा घेण्याचादेखील प्रयत्न केला आहे.

पाहा व्हिडीओ :

नशीब बलवत्तर म्हणून महिला बचावली

मात्र, नशीब बलवत्तर असल्यामुळे चौवा यांना साप दंश करु शकला नाही. सापाने धाव घेताच चौवा यांनी पळ काढला. अचानकपणे साप समोर आल्यामुळे त्या घाबरल्याचेही आपल्याला व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्या घाबरून थेट घरामध्ये पळून गेल्या आहेत.

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

चौवा यांनी या घटनेचा व्हिडीओ सुरुवातीला त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला होता. त्यानंतर आता त्याला यूट्यूबवर अपलोड करण्यात आले आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

इतर बातम्या :

Video | मशीन बंद पडल्यानंतर कामगारांचं भन्नाट जुगाड, नेमकं काय केलं ? एकदा पाहाच !

Video | विमानाच्या पंखाला लटकून तालिबान्यांची मस्ती, नवा व्हायरल व्हिडीओ पाहिलात का ?

Video | लग्न थाटामाटात, पण सासरला जाताना खवळली, नवरीने लगावली नवरदेवाच्या कानशिलात, व्हिडीओ व्हायरल

(snake jumps on woman tries to attack terrible video went viral on social media)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.