VIDEO : 73 वर्षांच्या आजोबांची स्केटबोर्डवर धमाल!, व्हिडीओ पाहून व्हाल चकीत

सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एक वयस्कर पुरुष स्केटबोर्डवर फिरताना दिसत आहे. हे आजोबा अतिशय मजा घेत स्केटबोर्डींग करत आहेत. विशेष म्हणजे त्यांच वय पाहता त्यांनी केलेली ही कामगिरी म्हणजे कमालच म्हणावी लागेल.

VIDEO : 73 वर्षांच्या आजोबांची स्केटबोर्डवर धमाल!, व्हिडीओ पाहून व्हाल चकीत

मुंबई: सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडीओज व्हायरल होतात. ज्यांना पाहून ते खरे आहेत की नाही? असा प्रश्न पडतो. आताही असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती अगदी निवांतपणे रस्त्यावर स्केटबोर्डींग करताना दिसत आहे. आता केवळ स्केटबोर्डींग करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ का व्हायरल होईल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल…पण या व्हिडीओमधील खास गोष्ट अशी आहे की, व्हिडीओतील व्यक्तीचं वय हे तब्बल 73 वर्ष आहे. इतक्या वयातही तो ज्या चलाखीने आणि उत्तमरित्या स्केटबोर्डींग करत आहे, ते खरंच वाखाणण्याजोगं आहे.

या व्यक्तीचं नाव इगोर असून त्यांच वय 73 वर्ष आहे. इंटरनेटवर धमाल करणाऱ्या इगोर यांच्या या व्हिडीओला मॅक्स टिमुखिन (Max Timukhin) नावाच्या एका फोटोग्राफरने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्याच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ असून यामध्ये इगोर हे स्केटबोर्डींग करताना वातावरणाचा आनंद घेत आहेत. या व्हिडीओला कॅप्शनमध्ये इगोर हे मागील 40 वर्ष म्हणजे 1981 पासून स्केटबोर्डिंग करत असल्याचं सांगितलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Max Timukhin (@timukhinmax)

व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस

व्हिडीओमध्ये इगोर यांना आनंदी पाहून नेटकऱ्यांनाही आनंद झाला आहे. त्यामुळे व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. एका यूजरने व्हिडीओवर कमेंट केली असून त्याने लिहिलं आहे की,‘इतक्या आरामात कोण स्केटबोर्डवर फिरतं? दुसऱ्याने लिहिलं आहे, ‘व्हिडीओ पाहून विश्वास बसत नाही की इतकं निवांत कोण स्केटबोर्डवर या वयात कोण फिरु शकतं?.’ तिसऱ्याने लिहिलं आहे की, ‘या वयातही हे काक जीवन जगत आहेत.’ याशिवाय अनेक कमेंट्स असून अनेकांनी व्हिडीओ शेअर देखील केला आहे.

इतर बातम्या :

VIDEO : पत्नीने कामाला लावल्याने नवरा वैतागला, त्यानं असं काही केलं की ते पाहून तुम्हीही पोट धरून हसाल!

Haryanvi Dance Song: ‘बिजली’ बनून स्टेजवर घातला धुमाकूळ, गोरी नागौरीचा हाय वोल्टेज हरयाणवी डान्स पाहिलात का?

Video | तरुणाचं मोबाईलमध्ये डोकं, अचानकपणे समोर आला कोब्रा, पुढं जे झालं ते एकदा पाहाच !

(The video of an elderly man riding skateboard in age of 73)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI