Viral: पत्रास कारण की.. चक्क टॉयलेट पेपरवर लिहीला राजीनामा, लोक हळहळले
एका कर्मचाऱ्याने आपल्याला कंपनीत 'टॉयलेट पेपर'सारखे वागवलं जात आहे असे शब्दश: दर्शविण्यासाठी त्याचा राजीनामा चक्क टॉयलेट पेपरवर लिहीला आहे. हा राजीनामा वाचून इंटरनेटवर लोक भावूक झाले आहेत.

एकाने सात शब्दात नोकरीचा राजीनामा दिल्याचे पत्र चांगलेच व्हायरल झाले होते. आता एका कर्मचाऱ्याचे आपल्या नोकरीचा राजीनाम्याचे पत्र चक्क टॉयलेट पेपरवर लिहील्याची एक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. या राजीनाम्यासाठी कर्मचाऱ्याने ऑफीसच्या टॉयलेट पेपरचा वापर केला आहे. एवढेच नाही तर टॉयलेट सीटवरच बसून हे महान काम त्याने केले आहे !
मला वाटतंय मी कोणा टॉयलेट पेपर सारखाच आहे. गरज पडली तर युज केले आणि नंतर फेकून दिले…एका उद्वीग्न कर्मचाऱ्याने बस एवढेच लिहीले आणि राजीनामा दिला. सिंगापूरच्या बिझनेस वुमेन्स एंजेला योह यांनी जेव्हा एका कर्मचाऱ्याचा हा राजीनामा वाचला तेव्हा त्यांना हृदय हेलावले.त्यानंतर तिने स्वत:ला एक प्रश्न विचारला की आम्ही आपल्या कर्मचाऱ्यांना केवळ त्यांच्या कामाच्या आधारेच जोखतो का ? त्यांची ओळख आणि भावनांना समजून घेतो ? त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची कहाणी आपल्या लिंक्डईन अकाऊंटवर शेअर केली आहे. ती आता लाखो लोकांच्या हृदयापर्यंत पोहचली आहे.

Toilet Paper Resign
सिंगापूरच्या बिझनेस वुमेन्स एंजेला योह पोस्टमध्ये लिहीतात की तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना इतके प्रेम द्या त्यांचे कौतूक करा की तुम्हाला त्यांनी सोडताना रागाने हा निर्णय घ्यायला नको तर प्रेमाने तुमचे आभार मानत त्यांनी जायला हवे. त्यांनी हे देखील लिहीलेय की या राजीनाम्यात कर्मचाऱ्याने वापरलेल्या शब्दाने मी आतून हलले आहे.
एंजेला यांनी राजीनाम्याचा फोटो शेअर केला आहे. जो टॉयलेट पेपरवर लिहीलेला आहे. त्यांच्या या पोस्टवर हजारो कमेंट्स आल्या आहेत. काहींना हा अनोखा राजीनामा वाटला, तर काही म्हटलेय की आपण सर्वच केव्हा ना केव्हा यातून गेलो आहोत. पर बोलणे आणि लिहीण्याची हिंमत होत नाही. अन्य एका युजरने कमेंट केली आहे की हा एक मूक परंतू शक्तीशाली विरोध आहे. अन्य एका युजरने लिहीलेय की लोक कंपनीच्या कारणांनी नव्हे तर मॅनेजरच्या वागण्याला कंठाळून जॉब सोडण्यास मजबूर होतात.
Toilet Paper Resign
एंजेला यांनी त्यांच्या पोस्टमध्ये हे स्पष्ट केलेले नाही की हा फोटो कर्मचाऱ्याचा होता की ही केवळ त्यांच्या लिंक्डइन पोस्ट साठी एक प्रतिकात्मक फोटो होता. टॉयलेट पेपरवरील राजीनामा भले नाटकीय वाटत असला तरी तो वर्मी लागला आहे आणि एक संदेश यातून स्पष्ट दिलेला आहे की लोकांसोबत योग्य व्यवहार करा किंवा मग चुकीच्या कारणांनी आठवण काढण्याची जोखीम उचलावी…
