Viral : ‘… मी सोडतोय: केवळ 7 शब्दांत नोकरीचा दिला राजीनामा, पत्र वाचून सर्वच हैराण
जेव्हा आपण नोकरी सोडतो, तेव्हा औपचारिकता म्हणून का होईना पण राजीनामा पत्र लिहितो,सगळ्यांचे आभार मानतो. परंतु अलिकडेच एका कर्मचाऱ्याने फक्त ७ शब्दांचा राजीनामा लिहून नोकरी सोडली.त्याचे हे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे

नोकरी सोडताना सर्वसामान्य कर्मचारी एक औपचारिक राजीनाम्याचे पत्र लिहीतात. त्यात ते आपल्या बॉस आणि सहकाऱ्यांचे आभार मानत असतात. आणि भविष्यात आपण संपर्कात राहूयात असे पत्रात लिहीलेले असते. परंतू अलिकडेच एका कर्मचाऱ्याने या सर्व परंपरांना तोडत केवळ 7 शब्दात आपला राजीनामा देत सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे. Reddit रेडीट वर या अनोख्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल होत आहे.युजरने हे पत्र शेअर करताना म्हटलेय की आमच्या टीमचा एक सदस्य अचानक ऑफीस मधून गायब झाला आहे.जेव्हा त्याच्या डेस्कची तपासणी केली तेव्हा हे छोटेसे पत्र तो सोडून गेला होता. त्यात लिहीले होते की , ‘ Charity accounting isn’t for me. I quit.’ म्हणजे चॅरिटी अकाऊंटींग माझ्यासाठी नाही. मी सोडतोय..’
या कर्मचाऱ्यांना या पत्रात कोणाचेही आभार मानलेले नाहीत की कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. रेडीटवर ही पोस्ट व्हायरल होत आहे.त्यात लिहीलेय की आमचा नवा कर्मचारी ऑफीस आला नाही. मग त्याचे टेबल चेक केले तर ही नोट मिळाली. हा अनोखा छोटेखाणी अवघ्या सात शब्दांचा राजीनामा खूपच व्हायरल होत आहे.या पोस्टला प्रतिक्रीया देताना अन्य युजरने स्वत:चे देखील अनुभव शेअर केले आहेत. काहींनी याला ‘इमानदार’ म्हटले आहे. तर कोणी ‘असभ्य’ आणि ‘अनप्रोफेशनल’ म्हणून त्याचा उद्धार केला आहे. भलेही या प्रकाराचा राजीनामा नियमांच्या विरुद्ध असेल पण आजच्या कामकाजाच्या ठिकाणची बदलती मानसिकता आणि स्ट्रेस लेव्हल देखील दर्शवत आहे.
येथे पोस्ट पाहा –
Our newest employee was MIA then we found this on his desk byu/when_air_was_breath inrecruitinghell
सात शब्दात राजीनामा…
व्हायरल होणाऱ्या या पोस्टवर एका युजरने लिहीलेय की, मी देखील बेस्ट बाय मध्ये असाच राजीनामा दिला होता. एक महिना शिफ्टवरच गेलो नाही. आणि त्यांनी मला आणखी शिफ्ट्स काम करायला सांगितले. दुसऱ्या एका युजरने म्हटले की एकदा माझ्या कंपनीने म्हटले की एक कर्मचारी बेपत्ता झाला आहे. नंतर कळले की त्याने स्वत:च नोकरी सोडली होती आणि कोणतीही माहीती कळविली नव्हती. एका युजरने म्हटले की मी पोस्ट – इट नोटवर राजीनामा लिहीले होते. कारण HR आणि बॉस दोघांनीही ऑफीस सोडले होते. चौथ्या एका युजरने लिहीलेय की मी एकदा मॅनेजरच्या डेस्कवर चिट्टी चिकटवली होती,लिहीले होते की,’ तूला सहन करु शकत नाही.मी जात आहे.कधी भेटू इच्छीत नाही आणि थेट कारमध्ये बसून निघालो.’
