Video: घरात सगळे जमिनीवर झोपले होते, अचानक घोरपड घरात घुसली, आणि त्यानंतर…

| Updated on: Nov 20, 2021 | 5:12 PM

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कुटुंबातील काही सदस्य जमिनीवर पडलेले दिसत आहेत. एक मुलगी टीव्ही पाहत असताना. इतक्यात एक मॉनिटर लिजर्ड म्हणजेच घोरपड तिथं शिरते. हे पाहून मुलगी घाबरते

Video: घरात सगळे जमिनीवर झोपले होते, अचानक घोरपड घरात घुसली, आणि त्यानंतर...
घरात घोरपड शिरली
Follow us on

अनेकदा तुम्ही पाहिले असेल की जेव्हा कुटुंब मोठे असतं आणि घर लहान असतं तेव्हा घरातील अनेक सदस्य जमिनीवर झोपतात. त्यामुळे काही वेळा त्यांना अनेक समस्यांनाही सामोरे जावं लागते. उदाहरणार्थ, काही वेळा झुरळं, कीटक कानात जाणं, विंचू वा इतर काचूकडा चावणं अशा अनेक समस्या होतात. असाच एक प्रकार बँकॉकमधून समोर आला आहे. जिथं एकाच कुटुंबातील काही सदस्य घरात जमिनीवर झोपलेले आहेत आणि त्यांच्या शेजारी घोरपड येते. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ( Family awakened from their nap suddenly monitor lizard came inside their home see what next)

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कुटुंबातील काही सदस्य जमिनीवर पडलेले दिसत आहेत. एक मुलगी टीव्ही पाहत असताना. इतक्यात एक मॉनिटर लिजर्ड म्हणजेच घोरपड तिथं शिरते. हे पाहून मुलगी घाबरते आणि जोरजोरात ओरडू लागते. मुलगी रडताना पाहून घरातील लोक उठतात. यानंतर, मुलगी हातवारे करून मॉनिटर लिजर्ड घरात घुसल्याचं सांगते. त्यानंतर ती व्यक्ती काठी घेऊन घराबाहेर काढते.

व्हिडीओ पाहा

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात घबराट पसरली. अनेक युजर्सनी या व्हिडीओवर कमेंट्सद्वारे आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘हे खरोखरच भयानक होते, जर घोरपड एखाद्याला चावली असती तर, मोठी दुर्घटना घडू शकली असती. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘भाऊ! जमिनीवर झोपणे खरोखरच धोकादायक आहे.’ दुसऱ्या युजरने लिहिले, ‘मुलीने तिचा आणि तिच्या कुटुंबाचा जीव वाचवला.

बँकॉकचा हा धक्कादायक व्हिडिओ CGTN America नावाच्या अकाऊंटने ट्विटरवर शेअर केला आहे. बातमी लिहिपर्यंत या व्हिडिओला 18 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच या व्हिडिओला शेकडो रिट्विट्स आणि लाईक्सही आले आहेत. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, हे सरडे कुजलेल्या वस्तू खातात. फिलीपिन्समधून अमेरिकेतही या घोरपडींची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. एका अहवालानुसार, एका घोरपडींची किंमत सुमारे 70 हजार रुपयांपासून ते दोन लाख रुपयांपर्यंत असू शकते. या घोरपडी पाण्यावर अवलंबून असतात आणि त्या लांबपर्यंत पोहू शकतात. म्हणूनच या अनेक बेटांवर सापडतात.

हेही पाहा:

Video: मुलाचं मुंडन आणि आई ढसाढसा रडली, भावूक झालेला आईचा व्हिडीओ 4 कोटी लोकांनी पाहिला!

तिरुमला तिरुपतीत वरुणराजाचा रुद्रावतार, सोशल मीडियावर धक्कादायक व्हिडीओंचा पूर, पाहा भयानक दृश्यं