दुष्काळामुळे काय दिवस पहावे लागतायत, शेतकरी आणि बैल दोघे रडले, मन हेलावून सोडणारं दृश्य

त्याच्या दु:खाचा आवेग इतका होता की, शेजारी उभ्या असलेल्या माणसाने त्याला छातीशी कवटाळलं. या बैल जोडीमुळे मी शेती करु शकलो. हे माझ्या मुलासारखे आहेत असं तो शेतकरी सांगत होता.

दुष्काळामुळे काय दिवस पहावे लागतायत, शेतकरी आणि बैल दोघे रडले, मन हेलावून सोडणारं दृश्य
Farmer cried while left Bull
| Updated on: Oct 05, 2026 | 5:45 PM

माणूस ज्या प्रमाणे आपल्या मुलाबाळांवर प्रेम करतो, त्यांना जीव लावतो. तशीच माय तो घरातल्या मुक्या जनावरांवरही करतो. आपल्या आसपास अशी अनेक उदाहरणं आपण नेहमी पाहतो. घरातल्या श्वानावर जीवापाड प्रेम केलं जातं. कुटुंबातला एखादा सदस्य असल्यासारखी त्याला वागणूक मिळते. शहरी भागात जसं श्वानावर प्रेम केलं जातं, तसं गावाकडे गायी, बैलाला जीव लावतात. अशीच एक घटना सोशल मीडियावर व्हायरल होतेय. सध्या देशातल्या अनेक भागात दुष्काळी परिस्थिती आहे. एल निनोचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतोय. अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय. त्यामुळे शेती आसोड पडली आहे. पाऊस नसल्यामुळे काही भागांमध्ये पेरणी वाया जाणार आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्याचे हाल होत आहेत.

शेतकऱ्याची अवस्था अशी झाली की पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांसाठी चारा नाही. त्यामुळे शेतकऱ्याला आपली जनावरं निवारा छावण्यांमध्ये सोडावी लागतायत. गुजरातच्या राजकोट मध्येही महाराष्ट्रासारखीच स्थिती आहे. तिथेही दुष्काळामुळे अतिशय गंभीर स्थिती आहे. असाच राजकोट मधल्या शेतकऱ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ भावनिक करणारा आहे. आपल्या लाडक्या बैल जोडीला निवारा केंद्रात पाठवताना शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं.

Loading...

मुक्या जनावराचा तो चेहरा मनाला भिडतो

आपल्या बैलाला सोडताना शेतकरी रडत होता. त्याच्या दु:खाचा आवेग इतका होता की, शेजारी उभ्या असलेल्या माणसाने त्याला छातीशी कवटाळलं. या बैल जोडीमुळे मी शेती करु शकलो. हे माझ्या मुलासारखे आहेत असं रडत, रडतच शेतकरी सांगत होता. दुष्काळामुळे बैलाच्या चारा पाण्यासाठी पैसा नसल्याने त्याला निवारा केंद्रात सोडण्याशिवाय त्या शेतकऱ्याकडेही पर्याय नाही. व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काळीज पिळवटून जातं. मुक्या जनावराचा तो चेहरा मनाला भिडतो. खरचं कधी, कधी माणसाचं परिस्थितीपुढे काही चालत नाही हेच त्यातून दिसतं.

मालकाला कोट्याधीश बनवणारा ओम्या बैल

मध्यंतरी महाराष्ट्रातील ओम्या बैलाच्या स्टोरीने वाचकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या ओम्या बैलाने त्याच्या मालकाला कोट्याधीश बनवलेलं. या ओम्या बैलाने शर्यतीतून मालकाला मालामाल केलं. सहा-सात थार गाड्या, दोन स्कॉर्पिओ, दोन ते तीन जेसीबी, आठ ट्रॅक्टर, अगणित दुचाकी, चांदीची गदा आणि असंख्य ट्रॉफी जिंकून दिल्या. या लाडक्या ओम्या बैलाचे २७ ऑगस्ट रोजी निधन झाल्यानंतर ओम्याचे मालक रामनाथ वारिंगे अक्षरश: दु:खात बुडून गेले होते.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us