माझ्या मुलाला सोड आणि चालती हो… लग्नाच्या रात्रीच सासऱ्याने सूनेला दिली अशी ऑफर की..
लग्न फक्त दोन व्यक्तींचं होत नाही तर दोन कुटुंबही जोडली जातात. आनंद, नवी सुरूवात, नव आयुष्य... अनेकजण लग्नाची स्वप्नं पहात असतात. असंच स्वप्न एका नववधूने पाहिलं होतं. पण लग्नाच्या रात्रीच तिला मोठा धक्का बसला कारण...

Trending Story : लग्न फक्त दोन व्यक्तींचं होत नाही तर दोन कुटुंबही जोडली जातात. आनंद, नवी सुरूवात, नव आयुष्य… अनेकजण लग्नाची स्वप्नं पहात असतात. असंच स्वप्न एका नववधूने पाहिलं होतं. लग्नासाठी एका जोडप्याने त्यांच्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना बोलावलं होतं. पण जेव्हा वधूला समजलं की, काही लोकांना ती आवडत नाही तेव्हा तिला धक्काच बसला. आणखी मोठा धक्का तर तिला सासरच्यांमुळे बसला. लग्न होऊन अवघे काही तासही उलटत नाहीत तोच सासरच्यांनी तिला पैसे देऊ केले आणि तिथून निघून जाण्यास सांगितलं. यामुळे प्रकरण अधिकच चिघळलं.
नववधून आपल्या मुलाला सोडावे याबदल्यात सासरच्या लोकांनी तिला 4,000 पौंड (सुमारे 4 लाख रुपये) रोख देऊ केले. तसेच मुलाला चांगली मुलगी मिळेल अशी आशाही व्यक्त केली. ही गोष्ट एका लग्नाच्या पाहुण्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर शेअर केली आहे. बघता बघता ही पोस्ट व्हायरल झाली.
मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, ही पोस्ट शेअर करणाऱ्या व्यक्तीने लिहीलं की, ‘ मी एका लग्न समारंभात गेलो होतो, तिथे तीन पक्ष होते. काही जण वधूच्या बाजूने, काहीजण वराच्या बाजूने तर काही लोक हे वराच्या आईच्या माहेरचे होते. मी दोन्ही बाजूच्या लोकांशी बोलत होतो. पण वराच्या घरच्यांना वधू पसंत नव्हती. त्यांना वाटत होतं की त्यांच्या मुलासाठी योग्य नाही. तेवढ्याच वराचे पालकही तिथे आले आणि त्यांनी प्रिस्टला तो लग्न समारंभ थांबवण्यास सांगितले. पार्टीत असाही एक क्षण आला जेव्हा वराच्या वडिलांनी वधूसोबत डान्स केला, पण काही मिनिटांनंतर वधू तिथून दूर गेली. वराच्या वडिलांनी तिला रोख रक्कम दिली आणि ताबडतोब निघून जा किंवा लग्न रद्द कर असं सांगितले.’
त्या लग्नास उपस्थित असलेल्या पाहुण्याने सांगितलं की त्या रात्री सर्वांनी वधूच्या सासरच्या लोकांचा अवतार पाहिला. ते तिला शिवीगाल करण्यास आणि प्रसंगी तिच्यावर हल्ला करण्यासही तयार होते. पण चांगली गोष्ट ही होती की तिचा नवरा तिच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला, हेच नशीब. पत्नीसोबत नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी त्याने कुटुंबाशी संबंध तोडले. आज त्या वधू-वरांच्या लग्नाला 30 वर्षे झाली आहेत. त्यांना दोन मुले आहेत. पण काही कारणास्तव ते वराच्या कुटुंबापासून दूर राहतात.
या पोस्टवर लोकांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. ‘मला वाटतं, वराच्या आई-वडिलांच्या लग्नात प्रेम नव्हतं, म्हणूनच त्यांना लोकांपेक्षा पैसा जास्त मोलाचा वाटला,’ असे एका युजरने लिहीलं तर दुसर्या यूजरने लिहिले की, ‘ या लग्नात काय अडचण होती ? त्यांचा धर्म वेगळा होता की जात ? सामाजिक/आर्थिक वर्ग ? ते दोघं इतकी वर्षं एकत्र आहेत, मला खात्री आहे की ती (वधू) एक चांगली महिला असेल.’ बऱ्याचा लोकांनी कमेंट करत त्या पोस्टला सपोर्ट दर्शवला.
