Snake nevla Fight Video: फणा उगारुन ऐटीत उभा होता किंग कोब्रा, केवळ 15 सेकंदात मुंगुसाने दिला धोबीपछाड

रस्त्यावर एका किंग कोब्रा आणि मुंगूसाच्या झालेल्या तुंबळ लढाईचा व्हिडीओ व्हायरल अलिकडे व्हायरल होत आहे. या पारंपारिक शत्रूंचा प्रत्येक डाव पाहणाऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत होता. रस्त्यावर भर उन्हात सुरु असलेले हे युद्ध पाहण्यासाठी बघ्यांची रिघ लागली होती.

Snake nevla Fight Video: फणा उगारुन ऐटीत उभा होता किंग कोब्रा, केवळ 15 सेकंदात मुंगुसाने दिला धोबीपछाड
| Updated on: Jun 03, 2025 | 9:21 AM

सांप आणि मुंगुसाची दुश्मनी जगजाहीर आहे. हे पारंपारिक शत्रू जेव्हा एकमेकांसमोर येता. तेव्हा घमासान युद्ध छेडले जाते. लहानपणापासून यांच्या हाडवैर आपण पाहात किंवा ऐकत तरी आलो आहोत.जेव्हा जेव्हा यांचे युद्ध होते तेव्हा हे एकमेकांचा जीव घेण्याच्या मागेच असतात. अशाच एका किंग कोब्रा आणि मुंगूसाच्या लढाईचा थरार भर रस्त्यावर पाहायला मिळाला आहे.

साप आणि मुंगूसाच्या दुश्मनीची अनेक कारणे सांगितली जातात. काही समजूती आहेत तर काही अख्यायिका आहेत. काहींच्या मते मुंगूस सापाला मारते कारण त्याला वाटते की त्याच्या पिल्लांना सापांपासून भिती असते. तर सांप स्वत:ला जीवंत ठेवण्यासाठी मुंगूसाशी दोन हात करीत असतो. चक्क किंग कोब्रा आणि मुंगूसाच्या लढाईचा थरारक सामना झाल्याचा एक व्हिडीओ अलिकडे सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दोघेही एकमेकांवर प्राणपणाने तुटून पडताना दिसत आहेत.

व्हिडियोत भर रस्त्यावर किंग कोब्रा फणा उगारुन मुंगूसाशी लढताना दिसत आहे. यावेळी मुंगूस आणि किंग कोब्रा यांचा आकार नेहमीच्या पेक्षा लहान दिसत आहे. या घमासान युद्धाला पाहण्यासाठी सोसायटीतील लोकांची गर्दीही झाल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. किंग कोब्रा फना उगारताच पाठून मुंगूसाने त्याच्याची मानेवर हल्ला केल्याचे दिसत आहे. किंग कोब्रा स्वत:ला मुंगूसाच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. परंतू त्याच्या एवढाच चपळ असलेल्या मुंगूसावर हल्ला करताना किंग कोब्रा दिसत आहे. तरीही कोब्राला किंग कोब्रा कशी काय मात देतो हे पाहणे खतरनाक शहारे आणणारे आहे.

येथे पाहा व्हिडीओ –

या व्हिडीओत सापाची आणि मुंगुसाची लढाई पाहण्यासाठी आजूबाजूला लोक उभे असलेले दिसत असून ते खूप काळजीपूर्वक ही लढाई पाहत आहेत. यावेळीही मुंगूस ही लढाई जिंकताना दिसतोय…पण तुम्ही कधी विचार केला आहे का ? या व्हिडीओतील युद्धातही किंग कोब्रा या मुंगूसावर हल्ला करताना दिसत आहे. तरीही मुंगूसाला या विषारी किंग कोब्राच्या विषाचा काहीही परिणाम कसा होत नाही अशा प्रश्न पडतो….

सापाचे विष मुंगूसाला मारत का नाही?

साप आणि मुंगूसाच्या युद्धात विषाचा मुंगूसावर कोणताही परिणाम होत नाही.विषारी सापाने जरी मुंगूसावर डंख मारला तरी, मुंगूसाच्या शरीरात असलेले रिसेप्टर्स सापाचे विष शरीरात भिनण्याआधीच ते निष्क्रीय करतात. हेच कारण आहे की साप बऱ्याचदा लढाईत मुंगूससमोर गुडघे टेकतो…

शत्रुत्वाचा जुना वारसा…

विषारी साप किंग कोब्रा आणि मुंगूस यांच्यातील या तुंबळ लढाईचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या X पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ कोठला आहे हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. परंतु अवघ्या १५ सेकंदांची ही व्हिडीओ क्लिप आतापर्यंत २ लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे.

एकमेकांचे कट्टर शत्रू असलेल्या या प्राण्यांच्या “वन टू वन” लढाईवर अनेक युजरनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय की, ‘हे विधीलिखित युद्ध आहे, जे कधीही संपणार नाही.’ दुसऱ्या एका युजरने लिहिलेय की, ‘ही जुनी दुश्मनी आहे.’ तर तिसऱ्याने एका युजरने लिहीलंय, ‘मुंगूस हे नेहमीच ही लढाई जिंकते.’